World Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – आज माणूस आपल्या कामात आणि नात्यात इतका गुंग झाला आहे की त्याला आपले शरीर आणि मन निरोगी आणि शांत ठेवण्यास वेळ मिळत नाही. हेच कारण आहे की आज लोक बर्‍याच आजारांना बळी पडत आहेत. हृदय रोग हा त्यापैकी एक आहे. हृदयविकाराच्या रूग्णांची संख्या जगभरात वाढत आहे आणि त्याचे मुख्य कारण चुकीच्या पद्धतीने आहार घेणे, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावांसह जीवन व्यतीत करणे हे आहे.

दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदयदिन साजरा केला जातो. लोकांना हृदयविकाराची जाणीव व्हावी या उद्देशाने हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. जागतिक हृदय दिनाच्या दिवशी आरोग्याशी संबंधित विविध संस्था लोकांना जागरूकही करतात. कार्डिनल हेल्थ (Cardinal Health) ने यावेळी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ते सर गंगा राम रुग्णालयाचे डॉक्टर आरआर मंत्री यांच्या मार्फत जागतिक हृदय दिनाच्या दिवशी लोकांना संदेश देत आहेत.

पहा व्हिडीओ

https://www.youtube.com/watch?v=SYxwoSMKzrw&feature=youtu.be

योग्य आहार आणि नियमित व्यायामासह हृदय ठेवा निरोगी
हृदयविकाराची तीव्रता समजून घेत आपण आपल्या हृदयासाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी योग्य असा आहार निवडला पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड, सिगारेट आणि अल्कोहोलपासून दूर राहिले पाहिजे. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. या व्यतिरिक्त आपण केवळ अर्धा तास नियमित व्यायामाची सवय लावायला पाहिजे. आपण चालायला जाऊ शकता, धावू शकता किंवा सायकल चालवू शकता.

कोरोना विषाणू आणि हृदय रोग
कोरोना व्हायरस आणि हृदयरोगाची लक्षणे बर्‍याचदा सारखीच असल्याचे पाहिले जाते. हृदयरोगात ताप कमी असतो, परंतु खोकला, श्वासोच्छवास, छातीत घट्टपणा आणि घाम येणे ही लक्षणे दोन्ही आजारांमध्ये सारखीच आहेत. जेव्हा अशी लक्षणे दिसतात, तेव्हा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा टेली मेडिसिनची मदत घ्यावी. डॉक्टरांना योग्य वाटल्यास ते रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतील.

हृदयविकाराच्या रुग्णांना विशेष सल्ला
जर आपण हृदयविकाराने त्रस्त असाल तर काळजी घ्या की आपल्याकडे हृदयाशी संबंधित औषधांचा स्टॉक असावा. आवश्यक असल्यास अतिरिक्त औषधे मागवून ठेवा. आपण काळजी घेतली पाहिजे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करू नये. हे देखील लक्षात ठेवा की आपल्याकडे आपल्या डॉक्टरांचा, नातेवाईकांचा आणि मित्रांचा फोन नंबर असावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकाल. माणसाने आपल्या आयुष्याला गोल ओरिएंटेड केले आहे. पण मजेची गोष्ट म्हणजे त्याने शरीर निरोगी ठेवण्याचे कोणतेही लक्ष्य ठेवलेले नाही. आपल्याला आपल्या शरीराची आणि हृदयाची पूर्ण काळजी घ्यावी लागेल, कारण निरोगी शरीरासह आपण आपल्या जीवनात पुढे जाल आणि लक्ष्य देखील साध्य कराल.