5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या कोणत्या पदार्थातून मिळतील

पोलीसनामा ऑनलाइन – काही पोषकतत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी खुप आवश्यक असतात. ही पोषकतत्व मिळाल्यास डोळे निरोगी राहू शकतात. ही पोषकतत्व हानिकारक प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करतील आणि वयाशीसंबंधीत आजार रोखण्यात मदत करतील. अशा 5 पोषक तत्वांबाबत आपण जाणून घेणार असून ही पोषकतत्व कोणत्या पदार्थांमधून मिळतील याबाबत माहिती घेवूयात…

1 व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे डोळ्यांनी भूरकट दिसणे, मोतीबिंदू, अंधळेपणा होऊ शकतो. हे मिळवण्यासाठी बादाम, आक्रोड, शेंगदाणे, सूर्यफूलाचे बी, आळशीचे तेल, पालक, ब्रोकली, झींगा आणि जैतूनचे तेल आहारात घ्या.

2 व्हिटॅमिन सी
यामुळे डोळे निरोगी राहू शकतात. मोतीबिंदू होत नाही. हे मिळवण्यासाठी ब्रोकली, स्प्राउट्स, काळीमिरी, पालेभाज्या, आंबट फळे सेवन करा.

3 ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड
याच्या कमतरतेमुळे मॅक्यूलर डीजनरेशन, कोरडे डोळे आदी समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी मासे, टूना, नट आणि बी, आळशीचे तेल, कॅनोला तेल, इत्यादीचे सेवन करावे.

4 व्हिटॅमिन ए
व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी खुप आवश्यक असते. आंधळेपणाचे सर्वात मोठे कारण आहे व्हिटॅमिन ए ची कमतरता. हे मिळवण्यासाठी गाजर, बीट, रताळे, मटर, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, राजमा, बीन्स, अंडे सेवन करावे.

5 झिंक
हे डोळ्यांसाठी खुप महत्वाचे पोषकतत्व आहे. याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. याची कमतरता दूर करण्यासाठी रेड मीट आणि चिकन हे चांगले स्त्रोत आहेत. शेंगदाणे, लसूण, तीळ, राजमा, डाळी, सोयाबीन, आळशी, गवार, बदाम, मटर, गहू, अंडी यांचे सेवन करावे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like