आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवेल ‘हा” काढा, सरकारनं देखील दिला ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड -१९ चा प्रभाव रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांवर जास्त होत आहे. रोगप्रतिकारक शक्ती रोगाशी लढा देते आणि आपल्याला निरोगी ठेवते. ही रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी, आयुष मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात लोकांना आपल्या आहारात अशा गोष्टी समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे की, आपण कोरोनाच्या कहरातून सुरक्षित राहू शकता. ज्यात कोरोना टाळण्यासाठी काढ्याचे सेवन करण्याचा आग्रह धरला आहे, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढीस लागेल.

पिम्पली, सुंठ आणि काळी मिरी वापरुन तयार केलेल्या काढ्याचा वापर तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट करेल. कोणत्याही रोगास सामोरे जाण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे फार महत्वाचे आहे, ज्यामध्ये हा काढा आपल्याला खूप मदत करू शकतो. हा काढा तयार करण्यासाठी, पिम्पली, सुंठ, काळी मिरी, तुळशीची पाने एक लिटर पाण्यात शिजवा आणि दिवसातून २- ३ वेळा हा काढा प्या.

जाणून घेऊया याचे फायदे
पिम्पलीला आयुर्वेदात एक विशेष स्थान आहे. याचा वापर ओटीपोटात दुखणे, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी केला जातो. पिम्पलीमध्ये प्रतिजैविक घटक असतात, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजंतूंना वाढण्यास प्रतिबंध करतात.

काळी मिरीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात. त्याचबरोबर घसा खवखवणे, घसा दुखणे आणि टॉन्सिल्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काळी मिरीचा वापर करणे खूप फायदेशीर आहे.

सुंठच्या फायद्याबद्दल बोलायचे झाल्यास आले योग्य प्रकारे कोरडे झाल्यानंतर सुंठ बनते. सुंठचा उपयोग देखील काढ्यात केला जातो. यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. याला अँटीमाइक्रोबियल थेरपी असेही म्हटले जाऊ शकते.

काळी मिरी, पिम्पली, सुंठमध्ये व्हिटॅमिन के असते, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की व्हिटॅमिन के खूप मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ नये. या सर्वांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने देखील त्यास हानी पोहचू शकते, म्हणून योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. तसेच हा काढा आपण दिवसातून 3 ते 4 वेळा पिऊ शकता. याशिवाय तुम्ही हलक्या कोमट पाण्यात दालचिनी घाला आणि दिवसभर त्याचे पाणी प्या. याचा वापर केल्याने घश्याच्या वेदनापासूनही मुक्त होईल.