Healthy Breakfast Ideas | सकाळचा नाश्ता न केल्याने होते ‘हे’ गंभीर नुकसान, हेल्दी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा ब्रेकफास्टमध्ये समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Breakfast Ideas | सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्वाचे जेवण आहे. परंतु काही वेळा वेळेच्या कमतरतेमुळे काही लोक नाश्ता करणे टाळतात. पण काही लोक वजन वाढू नये यासाठी नाश्ता करणं टाळतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हेल्दी ब्रेकफास्ट (Healthy Breakfast) करणे खूप गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाश्त्यात काय खाता (Healthy Breakfast Ideas).

 

कारण हेल्दी ब्रेकफास्ट तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतो, तर अस्वास्थ्यकर नाश्ता देखील अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. नाश्त्यामध्ये नेहमी आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा. असेच काही नाश्त्याचे पर्याय जाणून घेवूयात ज्याचा तुम्ही नाश्त्यात समावेश करून वजन आणि मधुमेह नियंत्रित करू शकता (Healthy Breakfast Ideas).

 

नाश्ता न केल्याने होऊ शकतात या समस्या (These Problems Can Be Caused By Not Eating Breakfast) –

अ‍ॅसिडिटी

मेटाबॉलिज्म क्रिया मंदावते

ओव्हर इटिंगची समस्या

एनर्जीचा अभाव

मधुमेहाचा धोका

निरोगी नाश्त्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा (Include These In Your Diet For Healthy Breakfast) –

1. अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ (Eggs And Dairy Products) –
तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुम्ही तुमच्या नाश्त्यात अंडी खाऊ शकता. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. आणि जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही इत्यादींचे नाश्त्यात सेवन करू शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये पोषक तत्वे भरपूर असतात.

 

2. फळे आणि भाज्या (Fruits And Vegetables) –
नाश्त्यात ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. ज्यूस स्वरूपात फळे समाविष्ट करू शकता. त्यामुळे तिथे तुम्ही भाज्या उकळून आणि वाफवून खाऊ शकता. यामुळे वजन नियंत्रित राहते आणि शरीर दिवसभर ऊर्जावान राहते.

 

3. उपमा आणि पोहे (Upma And Poha) –
जर तुम्हाला दक्षिण भारतीय जेवणाची आवड असेल तर तुम्ही उपमा खाऊ शकता पण, जर तुम्हाला उपमा खायला आवडत नसेल तर तुम्ही नाश्त्यात पोहे खाऊ शकता. या दोन्ही गोष्टी हलक्या आणि आरोग्यदायी आहेत, ज्याच्या मदतीने वजनही नियंत्रणात ठेवता येते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Breakfast Ideas | healthy breakfast ideas these serious damages are caused by not having breakfast in the morning include these foods in breakfast to stay healthy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Sunlight | सूर्यप्रकाश, Vitamin D व्यतिरिक्त ‘या’ फायद्यांबद्दल जाणून घेणे आवश्यक

 

Parenting Tips | मुलाच्या नाकावर राग कायम राहिला तर त्याच्याशी ‘या’ पध्दतीनं वागा, दिसून येईल बदल

 

Ankylosing Spondylitis | पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका, एंजिलायझेशन स्पॉन्डिलायटीसची समस्या असू शकते