Healthy Breakfast Tips | प्रोटीनचा डबल डोस आहेत ‘या’ 4 गोष्टी, नाश्त्यात करा सेवन; दूर राहतील अनेक आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Breakfast Tips | आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, शरीरातील पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी प्रोटीन (Protein) अत्यंत आवश्यक असतात. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास केस गळणे, शरीरात सूज येणे (Swelling), फॅटी लिव्हर (Fatty Liver) आणि हाडे कमकुवत होणे (Weak Bones) अशा समस्या उद्भवू शकतात. शरीरात प्रोटीनची कमतरता भासू द्यायची नसेल तर हेल्दी नाश्ता करा. (Healthy Breakfast Tips)

 

जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये काही गोष्टींचा समावेश केलात तर तुम्हाला त्यांच्यापासून दुप्पट प्रोटीन मिळतील. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि वजन नियंत्रणात येण्यात मदत होईल. याबद्दल जाणून घेवूयात…

 

नाश्त्यात या चार गोष्टींचा समावेश करा, शरीर राहील निरोगी (Healthy Breakfast Tips)

 

1. अंकुरित सलाड (Sprouted Salad)
अंकुरित सलाडचे सेवन करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ते खाल्ल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता पूर्ण होते आणि दीर्घकाळ पोट भरलेले वाटते. तुम्ही मूग, हरभरा, सोयाबीन आणि शेंगदाणे यापासून सलाड तयार करून सेवन करू शकता.

2. दलिया (Oatmeal)
आहार तज्ञ डॉ. रंजना सिंग यांच्या मते दलिया हे आहारातील फायबर आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. नाश्त्यात याचे सेवन करणे आवश्यक आहे.

 

3. अंडी किंवा चीज (Eggs or Cheese)
आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंग सांगतात की, नाश्त्यात चीज किंवा अंडी घेतल्याने भरपूर प्रोटीन मिळतात.
दैनंदिन आहारात याचा समावेश केल्याने तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होईल आणि तुम्हाला दिवसभर उर्जा मिळेल.

 

4. प्रोटीन समृद्ध हिरवे मटार (Green Peas-Protein)
हिरवे मटार खाल्ल्याने पालकपेक्षा जास्त जास्त प्रोटीन मिळू शकतात. 100 ग्रॅम मटारमध्ये 5 ग्रॅम प्रोटीन असते.
हिरवे मटार फायबर युक्त अन्न (Fiber Rich Foods) आहे, जे शरीराची इम्युनिटी वाढवते. नाश्त्यात त्याचा समावेश जरूर करावा.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Breakfast Tips | eat protein rich food in breakfast you will get amazing benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tax Planning | ‘या’ 10 पद्धती अवलंबून तुम्ही वाचवू शकता टॅक्स, स्मार्ट प्रकारे तयार करा ‘फायनान्शियल प्लानिंग’

 

Vatsala Andekar Passes Away | पुण्याच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे 69 व्या वर्षी निधन

 

Tips to Remove Body Weakness | नेहमी कमजोरी जाणवते का? एनर्जीसाठी ‘या’ 6 गोष्टींची घ्या मदत; जाणून घ्या