Healthy Carbs | वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अतिशय प्रभावी आहेत ‘हे’ 4 फूड्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Carbs | स्वतःला फिट आणि शेपमध्ये ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, जे सर्वांनाच शक्य नसते. जर तुम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर हे प्रयत्न सतत सुरू ठेवावे लागतात. रोज किमान 15-20 मिनिटे तरी व्यायाम (Exercise) करावा, हा सल्ला आपण नेहमी ऐकतो, पण त्याचे पालन आपल्या सोयीनुसार करतो (Healthy Carbs).

 

जर तुम्ही त्या लोकांपैकी असाल ज्यांच्याकडे 15-20 मिनिटेही सुद्धा नाहीत, तर तुमच्यापुढे वजन आणि लठ्ठपणा (Obesity) थांबवण्यासाठी एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे आहार (Diet). त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हेल्दी कार्बोहायड्रेट रिच फूड (Healthy Carbohydrate Rich Food) पर्यायांबद्दल सांगणार आहोत जे खूप प्रभावी आहेत (4 Weight Loss Foods).

 

1. आटा ब्रेड (Brown Bread)
व्हाईट ब्रेड (White Bread) खूप चविष्ट असतो पण तो मैद्यापासून बनलेला असतो, त्यामुळे त्यात कॅलरीजचे प्रमाण (Calories Level) कितीतरी पटीने जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला ब्रेड आवडत असेल तर पांढर्‍याऐवजी ब्राऊन ब्रेडने त्यास रिप्लेस करा. पीनट बटर (Peanut Butter) बरोबर खा किंवा सँडविच बनवून, सर्व प्रकारे हा फायदेशीर पर्याय आहे.

 

2. फळे (Fruits)
फळांमध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट असतात. सफरचंद, संत्री, खजूर, जर्दाळू, ब्लूबेरी, किवी (Apple, Orange, Dates, Apricots, Blueberries, kiwi) ही अशी सर्व फळे आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवू शकता. तसेच, जर यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील चांगले असेल तर डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.

 

3. भाज्या (Vegetables)
फळांप्रमाणेच भाज्यांमध्येही हेल्दी कार्बोहायड्रेट असतात. यासोबतच भाज्या न्यूट्रीएंट्स आणि एनर्जीचा सुद्धा खजिना आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्या, विशेषतः हिरव्या भाज्या, जसे की पालक, दुधी, मेथी, बथुआ, काकडी, सोयाबीन (Spinach, Milk, Fenugreek, Bathua, Cucumber, Soybean), इत्यादी खा.

4. ओट्स (Oats)
नाश्त्यासाठी ओट्स हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे ज्यामध्ये हेल्दी कार्ब्स (Healthy Carbs) असतात.
तुम्ही ते दुधासोबत खाऊ शकता किंवा भाज्यांसोबत, ते आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे.
केवळ नाश्त्यातच नाही तर संध्याकाळी भूक लागल्यावरही तुम्ही ते खाऊ शकता. ओट्सचे लाडूही बनवता येतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

#Lifestyle #Health #Healthy Carbs #Healthy Carbs Options #Healthy Carbohydrates #Card Rich Foods #Weight Loss
#Weight Reduce #Fat Loss #Fat Reducing Foods #Healthy Food Options #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Carbs | healthy carbs that can prove to be very effective in the process of losing weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

How To Stop Nail Biting Habit | तुम्हाला सुद्धा नखे चावण्याची सवय तर नाही ना? जाणून घ्या कशी सुटका करून घ्यावी या सवयीपासून

 

Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

 

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार