Healthy Diet After Covid | कोरोनाच्या नंतर होत असेल मेंदूवर परिणाम तर ‘या’ 5 गोष्टींचा डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Diet After Covid | कोरोना (Corona) नंतर लोकांना अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या (Mental Health Problems) होऊ लागल्या आहेत. त्यामुळे काही लोकांच्या स्मरणशक्तीवर (Memory) परिणाम होत आहे. काही लोक चिंता (Anxiety) आणि झोप न लागण्याच्या समस्येने (Insomnia) त्रस्त आहेत. जास्त वेळ घरात राहिल्याने सुद्धा अनेक समस्या येत आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी, आपण आपल्या मानसिक आरोग्याची (Mental Health) काळजी घेणे आवश्यक (Healthy Diet After Covid) आहे.

 

मेंदू तीष्ण आणि सक्रिय करण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयोगी आहेत ते जाणून घेवूयात (Let Us Find Out Which Are The Things Which Are Useful To Keep Mind Sharp And Active)…

 

1. भोपळ्याच्या बिया – Pumpkin Seeds
मेंदूला निरोगी (Brain Healthy) आणि सक्रिय करण्यासाठी भोपळ्याच्या बिया देखील फायदेशीर आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर झिंक (Zinc) असते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants), मॅग्नेशियम (Magnesium), कॉपर (Copper) आणि आयर्नही (Iron) पुरेसे असते. भोपळ्याच्या बिया मेंदूला ऊर्जा देतात. यामुळे विचार करण्याची क्षमता सुधारते तसेच मेंदूचा विकासही चांगला (Healthy Diet After Covid) होतो.

 

2. अक्रोड – Walnut
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज अक्रोड खावे. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण (Brain Sharp) आणि निरोगी ठेवते. अक्रोडमध्ये असे पोषक घटक (Nutrients) असतात, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E), कॉपर, मँगनीज (Manganese) आणि अँटीऑक्सिडंट असतात.

 

3. अंडी – Egg
अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. अंडी हे शरीर आणि मन दोन्हीसाठी उत्तम अन्न आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि कोलीनसारखे (Choline) पोषक घटक असतात, जे मेंदूला निरोगी ठेवतात. व्हिटॅमिन बी उदासीनता आणि चिंता दूर करण्यास मदत करते. त्यामुळे तिथे कोलीनमुळे मेंदूची शक्ती वाढते.

 

4. डार्क चॉकलेट – Dark Chocolate
डार्क चॉकलेट मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते, तेवढेच त्याचे फायदेही आहेत.
कोकोपासून (Coco) बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स (Flavonoid) नावाचे अँटीऑक्सिडंट असते.
याच्या सेवनाने चिंता, तणाव आणि नैराश्य दूर होते.

 

5. हिरव्या भाज्या – Green Vegetables
मन निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करावा. हिरव्या भाज्या खाल्ल्याने मन मजबूत होते.
मानसिक आरोग्यासाठी तुम्ही पालक, ब्रोकोली (Broccoli) यासारख्या भाज्यांचा समावेश करावा.
या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट (Folate), बीटा कॅरोटीन (Beta Carotene) आणि ल्युटीन (Lutein) यांसारखे पोषक घटक असतात.
जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Diet After Covid | healthy and active brain add these superfood egg walnut pumpkin vegetable chocolate in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Steam | सर्दीसाठीच नाहीतर ब्लड सर्कुलेशनसाठीही वाफ घेणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या

 

Black Salt Health Benefits | चिमुटभर काळे मीठ नष्ट करू शकते शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

 

Nonalcoholic Fatty Liver Disease | मासिक पाळी वेळेवर येत नाही का? या गंभीर आजाराचा आहे धोका; जाणून घ्या सविस्तर