सावधान ! लहान मुलांना चुकूनही देऊ नका ‘हे’ 9 पदार्थ, वय वाढेल तसं शरीर होईल ‘आजारांचं’ घर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लहान मुलांच्या किंवा बाळाच्या पूर्ण विकासासाठी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. तरीही पालक त्यांच्या खाण्या-पिण्याला घेऊन काही चुका करतच असतात. याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आपण अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे लहान मुलांना खायला देणे टाळायला हवं.

1) मीठ – लहान बाळांना जास्त मीठ देता कामा नये. हे त्यांच्या मूत्रपिंडासाठी चांगलं नाही. लहान बाळांच्या जेवण किंवा जेवण बनवण्याच्या पाण्यात मीठ टाकू नये. याशिवाय स्टॉक क्युब्स किंवा ग्रेव्हीचा उपयोगही टाळला पाहिजे. कारण यात मीठ जास्त असते. याशिवाय त्यांना इतर खाद्यपदार्थांपासूनही दूर ठेवायला हवं. जसे की, बेकन, सॉस, मीठाचे चिप्स, क्रिप्स, रेडी मिल्स इत्यादी.

2) साखर – लहान बाळांना गोड पदार्थांपासून दूर ठेवा. त्यांना याची गरज नसते. त्यांना नैसर्गिक फळे आणि इतर गोष्टींमधून आवश्यक साखर मिळते. त्यांना जास्त प्रमाणात साखर दिल्याने त्यांचे दात खराब होऊ शकतात. याशिवाय लठ्ठपणा किंवा डायबिटीज होण्याची शक्यता असते.

3) मध – असे म्हणतात की, लहान बाळांना मध चाटायला द्यायला हवं. काही ठिकणी तर नवजात बालकांनाही मध खायला दिलं जातं. मुलांमध्ये यामुळे बोटुलिज्मची समस्या होऊ शकते. हा एक गंभीर आजार आहे. जो मुलांच्या आतड्यांसंबधी भागात असलेल्या विषाणुंच्या संक्रमणामुळे पसरतो. याशिवाय मधामध्ये असेही बॅक्टेरिया असू शकतात जे मुलांच्या पचनक्रियेवर परिणाम करतात.

4) गाईचं दूध – आईच्या दूधानंतर गाईचं दूध बाळासाठी निरोगी मानलं जातं. मुलांना गाईचं दूध अजिबात द्यायला नाही पाहिजे. कारण त्यात प्रोटीन, पोटॅशियम आणि सोडियमची अधिक मात्रा असते जी मुलांच्या पचनसंस्थेसाठी जड असते.

5) कच्चं गाजर – लहान बाळांना गाजर आणि मुळा यांसारखे कडक पदार्थ खायला देऊ नयेत. हे पदार्थ घशात अडकू शकतात. पाचन पचनसंस्थेवरही त्यांचा परिणाम होऊ शकतो.

6) शेंगदाणे किंवा शेंगा – 5 वर्षांहून लहान मुलांना शेंगदाणे किंवा शेंगा देणं टाळलं पाहिजे. कारण या गोष्टी घशात अडकण्याची शक्यता असते. तर कुटुंबात कोणाला फूड किंवा इतर अ‍ॅलर्जी असेल तर शेंगदाणे किंवा शेंगा देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

7) तांदळाचं पाणी – 5 वर्षांहून लहान मुलांना तांदळाचं पाणी देणं टाळलं पाहिजे. या अधिक प्रमाणात आर्सेनिक असू शकतं. आर्सेनिक असा असा घटक आहे ज्यामुळे मळमळ आणि उलट्यांचा त्रास, खोकला, थकवा, ताप, डोकेदुखी, पोटदुखी यांचा धोका असतो.

8) कच्चे मासे किंवा अंडी – लहान मुलांना कधीही कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मासे खायला देऊ नयेत. यामुळे फूड पॉईजनिंगचा धोका जास्त असतो. याशिवाय मुलांना कच्चं किंवा अर्धवट उकडलेलं अंडही देऊ नका.

9) चीज – पनीर मुलांसाठी एक निरोगी, संतुलित आणि स्वस्थ आहार ठरू शकतो जे कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन देतं. मुलांना हलकं चेडर पनीर, कॉटेज पनीर आणि क्रिम पनीर देणं टाळलं पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/