Healthy Drink | हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचवते अर्जुनची साल, अशाप्रकारे बनवून प्या काढा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Drink | अर्जुन वृक्षाची साल एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी प्राचीन काळापासून अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहे. अर्जुन वृक्षाच्या सालीपासून बनवलेला काढा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. (Healthy Drink) हा काढा बनवण्याची रेसिपी जाणून घेवूया (How to Make Arjun Bark Kadha).

 

अर्जुनची साल हृदयासाठी खूप फायदेशीर मानली जाते, तिच्या सेवनाने हार्ट अटॅक सारख्या घातक आजारांपासून दूर राहू शकता. यासोबतच अर्जुनची साल इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काम करते. तसेच शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही उपयुक्त आहे.

 

अर्जुन वृक्षाच्या सालीचा काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

३-४ तुकडे अर्जुन साल
७-८ तुळशीची पाने
१/२ इंच आल्याचा तुकडा

असा बनवा अर्जुन सालीचा काढा (How to Make Arjun Bark Kadha)

सर्वप्रथम अर्जुनाची साल नीट धुवावी.
नंतर ती रात्रभर एक कप पाण्यात भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी सालीसोबत एका भांड्यात घ्या.
नंतर त्यात आणखी तीन कप पाणी ओतून मध्यम आचेवर गरम करा.
यानंतर साधारण १-२ मिनिटे पाणी उकळल्यावर त्यात तुळशीची पाने आणि आल्याचे तुकडे टाका.
नंतर हे भांडे झाकून ठेवा आणि काढा अर्धा होईपर्यंत उकळवा.
यानंतर गॅस बंद केल्यानंतर सव्र्हिंग ग्लासमध्ये काढा गाळून घ्या.
आता तुमचा पौष्टिक अर्जुन सालीचा काढा तयार आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Drink | Arjuna bark protects against fatal diseases like heart attack, make and drink it like this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Homemade Rice Scrub | हिवाळ्यात वापरा घरी तयार केलेले हे ४ राईस स्क्रब, स्किनवर येईल ‘ग्लो’

Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान