Healthy Eating : आपल्या स्वयंपाकघरातून त्वरित हटवा या गोष्टी, आरोग्यासाठी धोकादायक
पोलीसनामा ऑनलाईन टीम : किराणा सामान खरेदी करताना आपण बर्याचदा अशा गोष्टी विकत घेतो, ज्या आरोग्यास मोठे नुकसान पोहोचवितात. जर आपण हेल्दी डाएट फॉलो करत असाल तर काही गोष्टी आपल्या किचनमध्ये ठेवणे टाळा. जाणून घेऊया या पदार्थांसंदर्भात ….
फ्लेवर्ड योगर्ड : फ्लेवर्ड योगर्डमध्ये साखर आणि सोडा मोठ्या प्रमाणात आढळतो. जर आपण ते सकाळी किंवा स्नॅक्समध्ये खाता तर ते शरीरासाठी धोकादायक असू शकते. जर आपल्याला फ्लेवर्ड योगर्ड खायचे असेलच तर प्लेन योगर्डमध्ये फ्रेश फ्रुट्स टाकून खाऊ शकता.
पॅकेज ओटमील : ओटमील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दिवसाची सुरुवात ओटमीलने करणे चांगली सवय आहे. परंतु आपल्याला प्लेन ओटमील खरेदी करून घरी स्वतः बनवावे लागेल. पॅकेज ओटमीलमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करणे टाळा.
प्रोसेस्ड फूड : प्रोसेस्ड फूडमध्ये कॅलरी आणि साखर खूप जास्त असते. आपण दिवसाची सुरुवात अंडीसारख्या प्रथिने समृद्ध पदार्थानी करावी. न्याहारीत अशा गोष्टी खायला हव्या ज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि यामुळे आपण दिवसभर सक्रिय राहतो. प्रोसेस्ड फूड हा सर्वात वाईट पर्याय आहे.
टोमॅटो केचअप : बाजारात टोमॅटो केचअप फ्रुक्टोज हाय असतात. यात साखरेचे प्रमाण जास्त असते.घरी बनविलेला टोमॅटोचा सॉस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आपण आपल्या किचनमधून टोमॅटो केचअपचे पॅकेट हटवावे.
मफिन्स : मफिन्स शरीरासाठी तितकेच हानिकारक आहेत, जितके काप केक्स,यात कॅलरीज जास्त प्रमाणात आढळते. यात फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि सोयाबीन ऑइल सारखे इन्ग्रेडियंट असतात, जे लठ्ठपणा वाढवितात.
न्यूटेला : न्युटेला बऱ्याचश्या लोकांची पहिली पसंती आहे. खासकरून लहान मुले ते आनंदाने खातात. परंतु यात साखर आणि पाम ऑइल असते. यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते खाणे टाळावे.
लो फॅट स्नॅक्स – वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक कमी फॅट स्नॅक्स खाणे पसंत करतात. बाजारात आढळणारे कमी फॅट स्नॅक्समध्ये बर्याच हानिकारक गोष्टींचा वापर करतात. प्रक्रिया केलेल्या लो फॅट स्नॅक्समध्ये अधिक साखर, तेल आणि आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यामध्ये केवळ नाममात्र पोषक असतात, म्हणून त्यांचे खाणे टाळले जावे.