मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पालकांनी लक्षात घ्याव्यात ‘या’ 6 गोष्टी !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्याच्या काळात वयस्कर माणसांप्रमाणेच लहान मुलेही अनेक आजारांना बळी पडत आहेत. अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा, लठ्ठपणा किंवा वजन कमी असणं अशा समस्या अनेक मुलांना येऊ शकतात. यासाठी आहारात डाळी, भाज्या, फळे, भाकरी, चपाती अशा पदार्थांचा समावेश असावा. याशिवाय आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे आपण आज जाणून घेणार आहोत. पुढील 6 टीप्स प्रत्येक पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात.

1) पॅकिंग फूड टाळून ताजे अन्नपदार्थ खायला हवेत. अनेक आजारांचं हेही एक कारण असतं. मुलांना पॅकिंग फूडपासून दूर ठेवायला हवं. अन्यथा याचा परिणाम आरोग्यावर होईल.

2) ज्या पदार्थांमध्ये कर्बोदके आणि जीवसत्व जास्त आहेत अशा पदार्थांचा आहारात समावेश असावा.

3) ताजी फळं किंवा ज्यूस किंवा रस मुलांना नियमित पाजायला हवा.

4) आहारत चपातीसोबत हिरव्या पालेभाज्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असावा.

5) तळलेले किंवा तेलकट पदार्थांत अतिसेवन टाळायला हवं.

6) कडधान्ये पालेभाज्या, डाळी अशा पदार्थांसह मुलांचा सकस आहार राहिल याकडे पालकांचं आवर्जून लक्ष असायला हवं. कारण आहार योग्य असेल तरीही आपण निरोगी राहतो.