‘रक्तशुद्धी’ आणि चेहऱ्यावरील ‘तेज’ वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रक्ताभिसरण क्रिया ही मानवी शरीरातील अतिशय महत्वाची क्रिया आहे. शरीरातील सर्व उपयुक्त घटक याच क्रियेद्वारे शरीरीभर पसरतात. शरीरात ऑक्सिजन पोहोचवणे, तापमान नियंत्रित ठेवणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करणे, आवश्यक भागास पोषण देणे, टाकाऊ घटक, हार्मोन्स आणि इतर पेशींच्या वाहतुकीचे कार्यदेखील रक्तामार्फत केले जाते. खाण्यामध्ये काही घातक अनावश्यक पदार्थ आल्यास रक्तात काही अशी तत्त्वे पोहोचतात ज्यामुळे शरीराचे नुकसान होते. यास रक्त अशुद्ध होणे म्हणतात. रक्त अशुद्ध झाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि त्वचारोगदेखील होतात.

लवकर थकवा जाणवणे, वजन कमी होणे, पोटांचे विकार आदी समस्या रक्ताच्या अशुद्धतेमुळेच होतात. त्यासाठी रक्त शुद्ध असणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्त आणि चेहऱ्यावरील तेज कायम राहील. रक्त शुद्ध ठेवण्यासाठी खर्चही येत नाही.

Advt.

अगदी सोपे घरगुती उपाय करून रक्तशुद्धी करता येऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्यास खूप चांगला परिणाम या समस्येत दिसून येतो. किडनीच्या सुस्थितीसाठी व तिच्या नियमित क्रियेला सुरळीत ठेवण्यासाठी पुरेपूर पाणी गरजेचे आहे. किडनी पाण्याच्या साहाय्याने शरीरास उपयुक्त नसलेले पदार्थ साफ करत असते. पाण्याने रक्त पेशीदेखील खुल्या होण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला वेग येतो. पाणी कमी प्यायल्याने किडनीसंदर्भातील आजार उद्भवतात. साधारणतः प्रत्येक व्यक्तीने किमान ८ ग्लास पाणी एका दिवसात प्यावे. यामुळे किडनीचे कार्य सुरळीत चालते आणि रक्तदेखील शुद्ध होते. ब्लूबेरी खाल्ल्याने लिव्हर चांगले राहते. लसूणसुद्धा रक्तशुद्धीसाठी उपयोगी आहे. लसणाने पदार्थांना विशिष्ट चव येते. शिवाय अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी लसणात असल्याने कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढत नाही.

शरीरातील रक्ताभिसरण क्रिया नियंत्रित राहते. कॉफीदेखील शरीरास उपयोगी आहे. कॉफी प्यायल्याने शरीराला सिरोसिसचा धोका नसतो. कॉफी लिव्हरला होणाऱ्या कॅन्सरपासूनदेखील वाचवते. क्रॅनबेरी शरीरातील युरिन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी ओळखले जाते. ते युरिनचे बॅक्टेरियापासून संरक्षण करते. ग्रेपफ्रूटमध्ये जास्त प्रमाणात असलेल्या अँटिऑक्सिडंट मुळे शरीरातील इंफ्लेमेशन नियंत्रित ठेवले जाते. लिव्हरची होत नाही.