यकृत ‘स्वच्छ’ आणि ‘निरोगी’ ठेवण्यासाठी ‘या’ 6 गोष्टींचा आहारात करा सामावेश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : यकृत (लीवर) हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर यकृत निरोगी असेल तर आपण पोटातील अनेक समस्या टाळू शकता. यकृत शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो तसेच रक्ताची घाण काढून टाकतो. याव्यतिरिक्त, यकृत एंझाइम्स सक्रिय करण्यासाठी देखील कार्य करते. निरोगी होण्यासाठी यकृत निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी काही निरोगी पदार्थांच्या मदतीने यकृत निरोगी ठेवता येते. यकृत अन्न पचवण्यासाठी कार्य करते. माात्र, आपल्या काही सवयीमुळे यकृत योग्य प्रकारे कार्य करत नाही. या सवयींमध्ये तळलेले आणि भाजलेले खाणे, व्यायाम न करणे, जास्त धूम्रपान करण्यासारखे वाईट व्यसन यांचा समावेश आहे. यकृतावरील अत्यधिक दबावामुळे ते शरीरातून विष योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नाही, ज्यामुळे शरीरावर अनेक समस्या उद्भवू शकतात. दरम्यान, जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल जे तुमचे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात.

ग्रीन टी

ग्रीन टी यकृतासाठी खूप चांगली मानली जाते. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे यकृत डिटोक्समध्ये मदत करतात. दिवसभरात 2-2 कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बीट
बीटमध्ये प्लांट-फ्लेव्होनॉइड्स आणि बीटा कॅरोटीन असतात. बीटचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बीट यकृत आणि रक्त दोन्ही स्वच्छ करण्यात मदत करते.

गाजर
गाजरांमध्ये ग्लूटाथिओन, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर पोषक घटक असतात. जे आरोग्य आणि यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते.

कांदा
कांदा कोणत्याही डिशची चव वाढविण्याचे कार्य करते. कांद्या शिवाय कोणतिही डिश तयार करता येत नाहीत. परंतु कांदा केवळ स्वयंपाकासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये सल्फर, अँटीबैक्टीरियल, अँटीवायरल, अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करतात.

लसूण
लसूणमध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटीमाइक्रोबियल तसेच प्रतिजैविक गुणधर्म असतात. हे शरीरातून हानिकारक विषारी पदार्थांचे बाहेर काम करून यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते.

लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीसमवेत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीराच्या विषाक्त पदार्थांना वगळण्यात तसेच चयापचय वाढविण्यास मदत करते. लिंबू यकृत निरोगी आणि मजबूत बनवू शकतो.