Healthy Foods | इम्यून सिस्टम मजबूत करायची असेल तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ 6 हेल्दी फूड्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Foods | कोरोना काळात इम्युनिटी मजबूत करणे ही काळाची गरज बनली आहे. या काळात लोकांनी या धोकादायक महामारीला रोखण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत (Lifestyle) अनेक बदल केले आहेत. वेळोवेळी हात धुणे, मास्क घालणे, निरोगी आहाराचे (Healthy Diet) पालन करणे किंवा नियमित व्यायाम (Regular Exercise) करणे इत्यादी (Healthy Foods).

 

इम्युनिटी (Immunity) कमजोर झाल्याने आपल्याला सर्दी (Cold), ताप ( Fever), खोकला (Cough) आणि फ्लू (Flu) इ. आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. इम्युनिटी (Immune System) मजबूत करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात (Healthy Foods) समावेश करू शकता ते जाणून घेऊया.

 

1. आंबट फळे (Citrus Fruits)
इम्युनिटी वाढवण्यासाठी मोसंबी (Sweet Lemon), लिंबू (Lemon), द्राक्ष (Grapes), टँजरिन (Tangerine) यासारख्या आंबट फळांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते. ती इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी पांढर्‍या रक्त पेशींचे (White Blood Cells) उत्पादन देखील वाढवते. त्या संसर्गाशी लढतात. तसेच इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.

 

2. लाल सिमला मिरची (Red Capsicum)
लाल सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन (Beta Carotene) जास्त प्रमाणात असते. बीटा कॅरोटीनचे शरीरात व्हिटॅमिन ए (Vitamin A) मध्ये रूपांतर होते. हे आपले डोळे आणि त्वचा निरोगी ठेवते. इम्युनिटी वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचाही चमकदार बनते.

 

3. ब्रोकोली (Broccoli)
ब्रोकोलीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) असतात. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, ई, फायबर आणि इतर अनेक अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

4. लसूण (Garlic)
लसूण कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम करते. तो जेवणाची चव तर वाढवतोच शिवाय आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदेही (Health Benefits) आहेत. त्यात असे गुणधर्म आहेत जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. तो इम्युनिटी वाढवण्यास मदत करतो.

 

5. आले (Ginger)
आले सूज कमी करण्यास मदत (Helps Reduce Swelling) करते.
हे घसा खवखवणे (Sore Throat) आणि सूज संबंधी आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते.
हे मळमळ टाळण्यासाठी देखील उपयोगी आहे. हे जुनाट वेदना कमी करते. त्यात कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म आहेत.

 

6. हळद (Turmeric)
हळद अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणांनी समृद्ध आहे.
तिच्यात कर्क्यूमिन (Curcumin) नावाचे तत्व असते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
जेवणाची चव वाढवण्यासोबतच ती इम्युनिटी मजबूत करण्याचे काम करते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Foods | healthy foods if you want to strengthen the immune system then add these healthy foods in the diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ यांचा डबल धमाका ! आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री करु शकला नाही हा ‘विक्रम’

 

Women Should Do These Things Before 30 | 30 वर्षाच्या वयापूर्वी महिलांनी अवश्य करावीत ‘ही’ 10 कामे; जाणून घ्या

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 116 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी