Healthy Heart | हृदयाच्या आजाराची भीती वाटते का? मग शरीरात होऊदेऊ नका या न्यूट्रिएंटची कमतरता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Heart | गेल्या काही वर्षांत जगभरात हृदयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताबद्दल बोलयचे तर ही समस्या जास्त गंभीर आहे, कारण इथे तेलकट आणि अनहेल्दी पदार्थ (Oily, Unhealthy Foods) खाण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे. जर हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर दैनंदिन आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता कधीही होऊ देऊ नका (Omega-3 Fatty Acid For Healthy Heart). ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड कोणत्या पदार्थामध्ये मुबलक प्रमाणात आढळते ते जाणून घेवूयात. (Healthy Heart)

 

ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडचे नैसर्गिक स्त्रोत

1. अक्रोड (Walnut)
अक्रोडाचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेत, या ड्रायफ्रूटमध्ये (Dry fruit) ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडसह कॉपर, व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि मॅग्नेशियम (Magnesium) सारखे महत्वाचे पोषक घटक असतात. मात्र, हे लक्षात ठेवले पाहिजे की अक्रोडाचा प्रभाव गरम आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात ते जास्त खाऊ नका.

 

2. सोयाबीन (Soybean)
सोयाबीन हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे, परंतु ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी अ‍ॅसिड देखील त्यात आढळते. जर तुम्ही हे नियमितपणे खाल्ले तर शरीराला फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आणि फायबरसारखे (Folate, Magnesium, Potassium, Fibre) पोषक तत्व देखील मिळतात. (Healthy Heart)

3. आळशीच्या बिया (Flax seeds)
आळशीच्या बिया ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा समृद्ध स्रोत मानल्या जातात त्या आपले हृदय निरोगी ठेवतात. याव्यतिरिक्त, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) सारखे महत्वाची पोषकतत्व या बियांमध्ये आढळतात.

 

4. मासे (Fish)
मासे हा ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा महत्त्वाचा स्रोत आहे. यासाठी तुम्ही सॅल्मन फिश खाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी5 मिळेल आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहील.

 

5. अंडी (Egg)
अंडे हे प्रामुख्याने प्रोटीनचे स्त्रोत मानले जाते, परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की
त्यामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर असते. त्यामुळे नाश्त्यात किमान 2 उकडलेली अंडी खावीत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Heart | omega 3 fatty acid for healthy heart attack coronary disease flax seeds soybean fish egg walnut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Food For Liver | ‘हे’ खाल्ल्याने होणार नाही लिव्हर डॅमेज, होतील अनेक फायदे

 

Ringworm | खाजेमुळे त्रस्त झाला आहात का, या टिप्सद्वारे दूर करा Fungal Infection

 

White Hair Problem Solution | कमी वयात डोक्याचे केस का होतात पांढरे? जाणून घ्या कसा करावा बचाव