Healthy Leaves For Women | महिलांच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक आहेत ‘ही’ 3 प्रकारची पाने, जाणून घ्या कशाप्रकारे करावे त्यांचे सेवन

पोलीसनामा ऑनलाइन – Healthy Leaves For Women | काम आणि आरोग्य यापैकी नेहमी महिला कामालाच प्राधान्य देतात, मग ती महिला घरात काम करणारी असो की बाहेर काम करणारी असो (Healthy Leaves For Women) . त्यांना असे वाटते की जर हलका घसा दुखत असेल किंवा डोकेदुखी (Headache) असेल तर ती आपोआप बरी होईल किंवा हाडदुखीसाठी (Bone pain) अर्धी गोळी पुरेशी आहे. परंतु, आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे (Women’s Health Tips).

 

आहारात भरपूर पोषक तत्वांचा समावेश असावा, ज्यामुळे शरीराला ऊर्जा आणि शक्ती दोन्ही मिळते. जरी अनेक पालेभाज्या (Leafy Vegetables) आपण खात असलो तरी अशी काही पाने किंवा औषधी वनस्पती आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात (Healthy Leaves For Women).

 

आहारात हेल्दी पाने (Healthy Leaves In Diet)

1. तुळस (Basil)

अनेक भारतीय कुटुंबांमध्ये तुळशीचे रोप लावले जाते. चहाची चव वाढवण्यासोबतच तुळस आरोग्यासाठीही चांगली (Basil Good For Health) आहे. तुळशीमध्ये शरीर आणि मन रिलॅक्स करणारे गुणधर्म आहेत आणि ती सूज कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील ओळखले जाते. गरम पाण्यात तुळस मिसळून प्यायल्याने सर्दी आणि घसादुखीपासूनही आराम मिळतो. तुळशीचे सेवन करण्यासाठी तुम्ही ती चहामध्ये, चटणीमध्ये किंवा थंड पेयांमध्ये घालून सेवन करू शकता.

 

2. पुदिना (Mint)

पुदिना त्याच्या थंडपणा आणि ताजेपणासाठी ओळखला जातो. पुदिन्यात व्हिटॅमिन ए, आयर्न, फोलेट आणि मँगनीज (Vitamin A, Iron, Folate And Manganese) भरपूर प्रमाणात असते. पुदिना पचनासाठीही खूप फायदेशीर आहे. पुदिन्याच्या सेवनाने मूड देखील चांगला राहतो आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील तो खूप प्रभावी आहे.

 

पुदिन्याची पानेही कच्ची चघळता येतात. तुम्ही पुदिन्याची चटणी, भाजी, स्मूदी, कूलिंग मिंट ड्रिंक किंवा चहा बनवून पिऊ शकता. जलजीरा आणि शिकंजीत पुदिन्याची चवही अप्रतिम लागते.

 

3. कढीपत्ता (Curry Leaves)

कढीपत्ता सामान्यतः मसाला म्हणून वापरला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासोबतच जुलाब, बद्धकोष्ठता आणि पोटातील इतर त्रासांपासूनही आराम देतात.

 

रिकाम्या पोटी कढीपत्ता खाणे फायदेशीर आहे. याशिवाय याचा वापर चटणी, भाजी आणि तडका देण्यासाठी केला जातो.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Leaves For Women | 3 healthy leaves for women to add in diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा