Health Tips : सकाळच्या ‘या’ 10 चूका शरीर बनवतील कमजोर, येईल अकाली वृद्धत्व, किडनी-लिव्हर रोगांचाही धोका

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे संकट आणि हिवाळ सुरू आहे. थंडीत इम्यूनिटी सिस्टम कमजोर होत असल्याने असाही अनेक संसर्गजन्य आणि मोसमी रोगांचा धोका वाढतो. याच कारणामुळे कोरोना आणि थंडीच्या दुहेरी मारापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला चांगली जीवनशैली आणि खाणेपिणे यावर लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून इम्यून पॉवर वाढवून रोगांशी लढता येईल. जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक जास्त आजारी पडतात. यापैकी अनेक लोक वयापूर्वीच कमजोर होऊ लागतात. सकाळी उठल्या-उठल्या लोक कोणत्या चुका करतात ते जाणून घेवूयात…

मोबाइलचा वापर
तरूण असो की, प्रौढ सकाळी उठताच मोबाइलचा वापर करू लागतात. यामुळे डोळ्यांवर अतिशय वाईट परिणाम होतो. डोळे कमजोर होतात.

ताबडतोब आंघोळ करणे
काही लोक झोपेतून उठताच आंघोळीला जातात, असे करू नये. कारण सकाळी शरीराचे तापमान अधिक असते आणि ताबडतोब आंघोळ केल्याने शरीराचे तापमान उचानक घसरते, यामुळे आजारी पडू शकता. यामुळे उठल्यानंतर किमान 20 ते 25 मिनिटांनंतर आंघोळ करा.

मसालेदार पदार्थ
सकाळच्या वेळी जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नये. हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत.

धूम्रपान करणे
धूम्रमान कोणत्याही वेळी केले तरी ते नुकसानकारकच असते. परंतु, सकाळी उठल्यावर सिगारेट पिणे खुपच धोकादायक असते. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.

रिकाम्या पोटी चहा पिणे
या सवयीमुळे पोटात गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा समस्या होतात. सकाळी उठल्यावर पाणी प्या, त्यानंतरच इतर पदार्थांचे सेवन करा.

अंथरूणातून एकदम उभे राहाणे
असे केल्याने बीपी अचानक लोहोऊ शकतो. चक्कर येऊ शकते. हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. यासाठी हळुहळु उठा. बॉडी स्ट्रेच करा. पाय हलवा. संपूर्ण शरीरात ब्लड सप्लाय नॉर्मल होऊ द्या.

खुप जास्त हेवी किंवा गोड खाणे
यामुळे थकवा, लठ्ठपणा वाढणे, सुस्ती येणे, शुगर आणि बीपी वाढण्याच्या समस्या होऊ शकतात. सकाळी नाश्त्यात ओटमील, दूध, अंडे, दलिया, कोमट लिंबू पाणी लाभदायक ठरते.

थंड पाणी पिणे
यामुळे बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. एनर्जीची कमतरता जाणवू शकते. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम 2-3 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. पोट साफ होते.

उन्हात न जाणे
यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होते. हे केवळ सकाळच्या उन्हातच मिळते. यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात काही काळ थांबा.

एक्सरसाइज न करणे
एक्सरसाइज न केल्याने लठ्ठपणा, थकवा, एनर्जीची कमतरता, बीपी, डायबिटीजची समस्या होते.

हे लक्षात ठेवा
अनेक अभ्यास आणि एक्सपर्ट या गोष्टीचा दावा करतात की, रोज सकाळी उठून केवळ 15 मिनिटे एक्सरसाइज करणे आणि हेल्दी ब्रेकफास्ट घेतल्याने आरोग्य आणि दिर्घ आयुष्य लाभते.