Healthy Liver | यकृताचे आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर करा ‘या’ गोष्टींचे सेवन; जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन टीम : Healthy Liver | धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. या स्पर्धात्मक जगामध्ये टिकवून राहण्यासाठी प्रत्येकाल स्वत:ला सिद्ध करावं लागत आहे. (Liver Health) परंतू यासगळ्याचा परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर (Physical And Mental Health) होत आहे. तसेच आपल्याला माहित असेल की, यासगळ्यामध्ये काहींना स्ट्रेस खूप असतो. तो घालवण्यासाठी तेमद्यपान करतात (Healthy Liver). मात्र त्याचा वाईट परिणाम त्यांच्या यकृतावर येतो. यकृताचे आरोग्य खराब होत जात. त्यामुळे ते आरोग्य कसं व्यवस्थित ठेवायचं यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत (Liver Health Tips).

 

– पपई (Papaya) : पपई खाल्ल्याने यकृताची सिरोसिसची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. याशिवाय पपई हे पोटासाठी किंवा एकूणच आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. तसेच यकृत मजबूत करण्यासाठी, तुम्ही पपईच्या पानांचा रस देखील पिऊ शकता. (Healthy Liver)

– आवळा (Amla) : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin-C) अधिक प्रमाणात असते. तसेच इतरही असे घटक असतात जे यकृताला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवतात. यामुळे आपण दररोज 2-3 आवळ्याचे सेवन केले पाहिजे.

 

– अंडी (Egg) : अंड्यातील प्रथिने आणि जीवनसत्त्वे (Proteins And Vitamins) यकृताच्या खराब झालेल्या
पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात. अंड्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स (Antioxidant)
यकृताला फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवण्याचे काम करतात.
त्यामुळे जर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्या टाळायच्या असतील तर अंड्याला तुमच्या आहाराचा भाग बनवावा लागेल.

 

– द्राक्षे (Grapes) : द्राक्षांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
हे अँटिऑक्सिडंट्स यकृताची जळजळ कमी करण्यास आणि त्याचे नुकसान होण्यापासून
रोखण्यासाठी उपयुक्त असतात, त्यामुळे तुम्ही द्राक्षांचे सेवन केलं पाहिजे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Healthy Liver | to keep the liver healthy include all these things in the diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा