Healthy Morning Routine | शरीर आणि मेंदू ठेवायचा असेल निरोगी तर ‘या’ 6 सवयींनी करा दिवसाची सुरुवात; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Morning Routine | आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर सुद्धा होतो. आपला पूर्ण दिवस कसा जाईल हे बर्‍यापैकी आपल्या मॉर्निंग रुटीनवर अवलंबून असते. आरोग्य तज्ज्ञांनुसार, सकाळच्या काही सवयी (Healthy Morning Routine) तणाव दूर करतात, मेटाबॉलिज्म सुधारतात, रात्री चांगली झोप येते आणि शरीर आतून निरोगी राहते. या सवयी कोणत्या जाणून घेवूयात…

1. भरपूर पाणी प्या –
सकाळी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय करून घ्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पोटाच्या समस्या होत नाही. शरीर निरोगी राहते.

2. लिंबू, आल्याचा ग्रीन टी –
लिंबू आणि आल्याचा ग्रीन टी एक पावरफुल अँटीऑक्सीडेंट आहे. यामुळे मेटाबॉलिक सुधारते, गॅस-अपचन समस्या दूर होते. व्हिटॅमिन सी मिळते.

3. नाश्त्याकडे लक्ष द्या –
दिवसाची सुरूवात हेल्दी ब्रेकफास्टने करा. ब्रेकफास्ट व्यवस्थित न केल्यास मेटाबॉलिज्म खराब होते. बॉडी फंक्शन बिघडते.

4. लवकर अ‍ॅक्टिव्ह व्हा –
एक्सपर्टनुसार फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीने दिवसाची सुरुवात करणे चांगले असते. यामुळे एंडोर्फिन हार्मोन तयार होते, ज्यास हॅप्पी हार्मोनही म्हणतात.

5. पुस्तक वाचा –
सकाळी-सकाळी वृत्तपत्र किंवा एखादे मॅगझीन वाचण्याचा प्रयत्न करा. यामुळे मन हलके होते. मन केंद्रित राहते. विचार लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न करा. यामुळे लक्ष्य आणि प्राथमिकता स्पष्ट होते. स्मरणशक्ती वाढते. (Healthy Morning Routine)

6. महत्वाचे निर्णय एक रात्र अगोदर करा –
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, सकाळच्या महत्वाच्या गोष्टींबाबत एक रात्र अगोदरच निर्णय घ्या. कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यासाठी सकाळचा वेळ चांगला मानला जात नाही.

Web Title :- Healthy Morning Routine | healthy morning routine 6 ways to start your day health tips

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Crime | धक्कादायक ! पोलिस ठाण्याच्या परिसरातच 16 वर्षीय मुलावर खूनी हल्ला

Pune Crime | विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी ! 2 वर्षापुर्वीच्या मर्डरचा पर्दाफाश, जाणून घ्या पुण्याच्या मुळशी तालुक्यातील प्रकरण

Pune Metro | विनाचालक धावणार पुणे मेट्रो; काम अंतिम टप्प्यात