Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Oils | हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवायचे असेल आणि जेवणात तेलाच्या बाबतीत तडजोड करायची नसेल, तर या समस्येवर उपाय आहे. ज्याचा आहारात समावेश करू शकता. जर कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Levels) किंवा रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित करत असाल आणि वजन कमी करण्यासाठी कठोर आहार घेत असाल, तर आहारातील सॅच्युरेटेड फॅट (Saturated Fat) कमी करण्याचीही गरज नाही. (Healthy Oils)

 

हृदयाच्या आरोग्यासाठी या तेलांचा आहारात करा समावेश

१. ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)
ऑलिव्ह ऑईलचा वापर सामान्यतः स्वयंपाकासाठी केला जातो. यामध्ये ए, ई, के आणि डी व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात.

 

२. आळशीचे तेल (Flaxseed Oil)
आळशी हे ओमेगा-३ चा उत्कृष्ट स्रोत आहे आणि ते अँटी-इंफ्लेमेटरी म्हणून ओळखले जाते. आळशीच्या बियापासून काढलेले तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते, कारण ते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते.

 

३. शेंगदाणा तेल (peanut oil)
हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका टाळण्यासाठी नेहमीच्या तेलाच्या जागी शेंगदाणा तेल वापरू शकता. कारण ते व्हिटॅमिन-ई आणि फायटोस्टेरॉलने समृद्ध आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Healthy Oils)

४. एवाकॅडो (avocado oil)
हे तेल स्वयंपाकासाठी वापरता येते, कारण त्यात ओलिक अ‍ॅसिड असते, जे मोनोअनसॅच्युरेटेड ओमेगा-९ फॅटी अ‍ॅसिडसाठी ओळखले जाते.

 

५. अक्रोड तेल (Walnut oil)
अक्रोड तेलात मॅग्नेशियम, कॉपर आणि मेलाटोनिन भरपूर असते, जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामध्ये अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड (एएलए) आणि ओमेगा -३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे तेल फक्त सॅलडसाठी वापरता येते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Oils | use these 5 healthy oils in food to control cholesterol level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास नकार देणाऱ्या अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात करा, भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल

Ranbir Kapoor | रणबीर कपूरच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आउट; होत आहे व्हायरल

Alia Bhatt | मातृत्वाबद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली “मूल जन्माला घालण्याचा निर्णय…”