Healthy Tea | चहा जास्त उकळवणे हानिकारक, ‘या’ 7 पद्धतीने बनवा हेल्दी Tea, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Tea | आपल्या देशात चहा पिणे एक संस्कृती बनले आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा चहा दिला जातो. बहुतांश लोक सकाळी उठल्यावर चहा पितात. हेल्थ एक्सपर्ट म्हणतात, जर चहा जास्तवेळ उकळला तर आरोग्याचे नुकसान होऊ शकते. परंतु चहा हेल्दी (Healthy Tea) पद्धतीने बनवला तर अनेक फायदे होऊ शकतात.

चहा हेल्दी बनवण्यासाठी अवलंबा या टिप्स

1. साखरेचे करा कमी सेवन
हेल्थ एक्सपर्ट सांगतात जर तुम्ही बिगर साखरेचा चहा प्यायलात तर तो जास्त हेल्दी होईल. साखरेऐवजी गुळ वापरू शकता.

2. चहा जास्त उकळवू नका
चहा जास्त उकळल्याने अ‍ॅसिडिटी व इतर समस्या होतात. चहा उकळल्यानंतर मध टाका.

3. चहापत्ती नेहमी चांगल्या दर्जाची वापरा
कारण खराब चहापत्तीची चव वाईट असतेच शिवाय आरोग्याचेही नुकसान होऊ शकते.

4. चहामध्ये दूध कमी टाका
पॅकेटऐवजी नैसर्गिक दूध निवडल्यास चहाची चव चांगली होईल, आरोग्यही उत्तम राहिल.

5. चहामध्ये करा या मसाल्यांचा वापर
चहा उकळत असताना त्यामध्ये लवंग, वेलची, आले, दालचिनी, तुळस किंवा केसर टाका. यामुळे चहा हेल्दी होतो.

6. रिकाम्यापोटी चहा पिऊ नका
हेल्थ एक्सपर्ट सांगतात रिकाम्यापोटी चहा पिऊ नका. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. सकाळी काही खाल्ल्यानंतरच चहा प्या.

7. तुळसयुक्त चहा प्या
चहातील कॅफीन अ‍ॅसिडिक असते आणि ते झोप डिस्टर्ब करते. कॅफीनपासून बचाव करण्यासाठी तुळसयुक्त चहा प्या.

Web Title :- Healthy Tea | tips for making healthy tea know here how to make tea and its benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amit Shah | अमित शहांनी चंद्रकांत पाटील यांची भेट टाळली?

SBI च्या ग्राहकांना गंभीर इशारा ! 30 सप्टेंबरपूर्वी तुम्ही केले नाही ‘हे’ काम तर बंद होईल अकाऊंट, जाणून घ्या

PMSBY | फक्त 1 रुपया दरमहिना खर्च करा आणि मिळवा 2 लाखाचे ‘कव्हर’, ‘या’ पध्दतीनं करू शकता रजिस्ट्रेशन; जाणून घ्या