मल्याप्रकरणाची सुनावणी; ऑर्थर रोडचा व्हिडिओ दाखवला

लंडन: वृत्तसंस्था

अनेक बँकांचे नऊ हजार कोटींहून अधिकची कर्जे बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या विरोधात ब्रिटनच्या कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीवेळी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओही दाखविण्यात आला असून याच कारागृहात त्याला ठेवलं जाणार असल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय कारागृहांची अवस्था प्रचंड वाईट आहे. त्यामुळे माझं प्रत्यार्पण करू नका, असं मल्ल्याने कोर्टाला म्हटलं होतं.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd574009-b679-11e8-a259-0fdfd9729a5e’]

लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला भारतीय अधिकारीही उपस्थित होते. मल्याला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत करण्यात येत असलेल्या तयारीचा व्हिडिओही कोर्टात दाखवण्यात आला. त्यानंतर हा व्हिडिओ तीन वेळा पाहिल्याचं मॅजिस्ट्रेटने सांगितलं. तर माल्याच्या वकिलाने तो निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला. किंगफिशरचं दिवाळं निघालं हे व्यावसायिक अपयश आहे. त्याला फसवणूक म्हणता येणार नाही, असा युक्तीवादही मल्ल्याच्या वकिलाने केला.
[amazon_link asins=’B07417987C,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c33ca63f-b679-11e8-b6c3-451a5c957aba’]

भारतीय कारागृहांची अवस्था प्रचंड वाईट आहे. त्यामुळे माझं प्रत्यार्पण करू नका, असं मल्ल्याने कोर्टाला म्हटलं होतं. त्यामुळे कोर्टाने मल्ल्याला ठेवण्यात येणाऱ्या तुरुंगाचा व्हिडिओ दाखवण्याचे निर्देश दिले होते.

जाहिरात.

मंत्र्याच्या पीएला १० लाख दिल्याचा दावा  

काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त 

सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात