Hearing Loss | तुमची ऐकण्याची क्षमता प्रभावित करू शकतात ‘या’ 4 सवयी, जाणून घ्या उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ऐकण्याची शक्ती (Hearing Power) ही अशी शक्ती आहे ज्याद्वारे आपण जगाशी संपर्क साधतो. त्यामुळे ती कमकुवत (Hearing Loss) होणे किंवा नसणे हे आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकते. आपण अशाच काही गोष्टी आणि सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा आपल्या आवश्यक इंद्रियांवर मोठ्या प्रमाणात परिणाम (Hearing Loss) होऊ शकतो.

 

1. ईअरबड्सचा जास्त वापर (Excessive Use Of Earbuds)
कान स्वच्छ (Ear Clean) ठेवणे ही चांगली गोष्ट आहे पण यासाठी जास्त इयरबड वापरणेही तितकेच धोकादायक आहे. आंघोळीनंतर काही वेळा कानात गेलेले पाणी काढून टाकण्यासाठी ते सतत कोणत्याही कामासाठी वापरणे कानांच्या आरोग्यासाठी (Ear Health) योग्य नाही. ईएनटी हॉस्पिटलमध्ये (ENT Hospital) जाऊन दोन-तीन महिन्यांत कान स्वच्छ करून घेणे चांगले.

 

2. मोठ्या आवाजात संगीत ऐकणे (Listen Too Loud Music)
मोठ्या आवाजात संगीत ऐकणे आणि ऑडिओ उपकरणांचा जास्त वापर यामुळे कानाच्या कार्यक्षमतेवर परिणाम (Effects On Ear Function) होतो. कधीतरी ऐकण्यात काही नुकसान नसते, पण तुम्ही सातत्याने मोठ्या आवाजात संगीत ऐकत असाल, तर काही काळाने आजूबाजूचे आवाज मंद होऊ लागतात. असे सतत केल्याने ऐकण्याची क्षमता कधी नष्ट होते (Hearing Loss) ते कळणारही नाही.

 

3. कान कोरडे न ठेवणे (Dry Ears)
वातावरणातील ओलाव्या व्यतिरिक्त, जर तुम्ही तुमचे कान जास्तवेळ ओले ठेवले तर त्यामुळे कानात बुरशीजन्य संसर्ग (ऑटोमायकोसिस) होऊ शकतो. तसेच, ही समस्या बहुतेक जलतरणपटूंमध्ये दिसून येते. या आजारात कानाच्या नलिकेच्या बाहेरील भागात संसर्ग होतो. संसर्गाचे कारण म्हणजे अ‍ॅस्परगिलस (Aspergillus) आणि कँडिडा (Candida) नावाचे बॅक्टेरिया, जे ओलाव्यामुळे वेगाने पसरतात.

4. खूप ताण आणि व्यायामाचा अभाव (Too Much Stress And Lack Of Exercise)
व्यायाम (Exercise) केल्याने शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त राहतो. ज्यामध्ये कानांचाही समावेश आहे. व्यायाम केल्याने कानात रक्ताभिसरण (Blood Circulation) व्यवस्थित होण्यास मदत होते. जे कानाचे कार्य योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असते.

 

#Lifestyle #Health #Hearing #Habits Damage Hearing #Habits Harm Hearing #Hearing Loss Causes #Hearing Loss Things #Hearing Loss Reasons #Lifestyle Aand Relationship #Health And Medicine

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hearing Loss | hearing loss these habits can weaken your hearing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Steam | सर्दीसाठीच नाहीतर ब्लड सर्कुलेशनसाठीही वाफ घेणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या

 

Black Salt Health Benefits | चिमुटभर काळे मीठ नष्ट करू शकते शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

 

Nonalcoholic Fatty Liver Disease | मासिक पाळी वेळेवर येत नाही का? या गंभीर आजाराचा आहे धोका; जाणून घ्या सविस्तर