महापौर वाकळे, छिंदम विरुद्धच्या ‘त्या’ खटल्यांची सुनावणी १४ जानेवारीला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा उमेदवार तथा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दाखल केलेल्या अर्जात तिसऱ्या अपत्याच्या जन्मतारखेला आक्षेप घेऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे तर अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांची झालेली निवड रद्द करावी. या खटल्यांची सुनावणी आता १४ जानेवारीला होणार आहे. अशी माहिती ॲड.एफ.एस.सय्यद यांनी दिली.

अहमदनगर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार तथा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात तिसऱ्या अपत्याची जन्मतारीख चूकीची असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे. यासाठी पराभूत उमेदवार अर्जुन बोरुडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तर अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना तो अपूर्ण असल्याने त्यांची निवड रद्द करावी अशी तक्रार पराभूत उमेदवार निलेश म्हसे यांनी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर झाली.

यावेळी वाकळे यांच्यावतीने म्हणणे दाखल करण्यासाठी मुदत मिळावी असा अर्ज न्यायालयात दाखल केला. या खटल्यात आपल्याला पार्टी करावे असा अर्ज डॉ. अकोलकर यांनी न्यायालयात दाखल केला. डॉ. अकोलकर यांच्या अर्जावर आपल्याला पार्टी का करावे, याचे कारण द्या. अशी विचारणा न्यायालयाने यावेळी करून अर्ज परत केला. तर छिंदम यांच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी निवडणूक अधिकारी यांनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, असा अर्ज न्यायालयात दाखल केला असता सदरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. अशी माहिती ॲड. एफ. एस. सय्यद यांनी दिली. या दोन्ही खटल्यांची सुनावणी दि. १४ जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

धनंजय मुंडेंचा पंकजांवर गंभीर आरोप, एखंडे खूनप्रकरण दडपण्याचा प्रयत्न