Heart Attack In Winter | हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ 5 सवयींनी स्वत:ला वाचवा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Heart Attack In Winter | हृदय (Heart) हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. ते नॉनस्टॉप कार्य करत असते. पण चुकीची जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयींमुळे हृदयाला खूप नुकसान होते (Heart Attack In Winter). उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांना अधिक सामोरे जावे लागते. हिवाळ्यात तापमान कमी होत असल्याने शरीराचे तापमान राखण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते (How To Avoid Heart Attack Risk In Winter).

 

जेव्हा हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते, तेव्हा आपली सिम्पेथेटिक नर्व्ह सिस्टम अ‍ॅक्टिव्ह होते आणि कॅटेकोलामाईन्सचा स्त्राव वाढू शकतो. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात ज्यामुळे हृदयगती, रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढू शकते. (Heart Attack In Winter)

 

या सर्व गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. अशा स्थितीत डॉ. झाकिया खान, Senior Consultant-Interventional Cardiology, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण यांनी हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत, त्या जाणून घेवूयात…

 

1. तणाव घेऊ नका –
तणाव (Tension) हे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांचे मुख्य कारण आहे. तीव्र तणावामुळे थेट हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि दीर्घकालीन तणावामुळे हृदयाच्या धमन्यांच्या आतील अस्तरामध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे सूज येऊ शकते, ज्यामुळे रक्त गोठणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

 

2. आवडणारे काम करा
चित्रकला, वाचन आणि संगीत ऐकल्यानेही तणाव कमी होतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही योगा आणि ध्यान देखील करू शकता. हे देखील खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.

3. भरपूर झोप घ्या-
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, दररोज पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
तसेच, काम करताना मध्ये ब्रेक घेत राहा.

 

4. रोज व्यायाम करा
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. थंडीच्या मोसमात घराबाहेर व्यायाम (Exercise) करणे टाळा, अन्यथा तुम्हाला थंडी वाजण्याची शक्यता आहे.
सायकलिंग, ट्रेडमिल, योगा यासारख्या इनडोअर व्यायामाचा पर्यायही तुम्ही निवडू शकता.

 

5. जास्त मीठ आणि साखर टाळा –
अन्नामध्ये सूर्यफूल तेल किंवा मोहरीचे तेल वापरा. ते पॉलीअनसॅच्युरेटेड आहे.
तुमच्या रोजच्या जेवणात सलाड आणि फळांचा समावेश करा. जास्त मीठ आणि साखर टाळा.

 

Advt.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Attack In Winter | heart attack risk increases in winter follow these tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

Pune Crime | गरिबीमुळे आईनं मोबाईल घेऊन दिला नाही, नाराज मुलाने उचललं टोकाचं पाऊल; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना