Heart Disease | हृदयरोगांपासून राहायचे असेल दूर तर रोज करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Heart Disease | संपूर्ण जगात हृदयरोगांमुळे दररोज लाखो लोक मरतात. हाय ब्लड प्रेशर, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजसारख्या समस्या हा धोका आणखी वाढवतात. काही लोकांमध्ये हे फॅमिली हिस्ट्रीमुळे होते, तर काही लोक आपल्या सवयींमुळे या आजाराला आमंत्रण देतात. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर हा धोका कमी करता येऊ (Heart Disease) शकतो.

1. जास्त फायबरयुक्त डाएट घ्या –
अमेरिकन हार्ट असोसिएशन आठवड्यात काही दिवस केवळ भाज्या आणि धान्य खाण्याचा सल्ला देते. जेणेकरून शरीरात जास्त फायबरची मात्रा जावी. यासाठी डाएटमध्ये ओटमील्स, धान्य, ब्राउन राईस, बीन्स, डाळ आणि फळांचा समावेश करावा.

2. वजनाकडे लक्ष द्या –
खुप जास्त वजन वाढणे हृदयासाठी धोकादायक आहे. यामुळे इतर आजारही वाढतात. यासाठी नियमित व्यायाम करा. चांगला आहार घ्या.

3. दररोज व्यायाम करा –
अमेरिकन हार्ट असोसिएशन दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देते. फिट राहिल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. ब्लड प्रेशर कमी होते, वजन कमी होते.

4. न्यूट्रिशन लेबल वाचा –
हार्ट हेल्दी डाएटचा अर्थ आहे की आपल्या सोडियम, शुगर आणि फॅटच्या मात्रेवर लक्ष ठेवा. या गोष्टी ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल वाढवता. पॅक्ड फूड नुकसानकारक आहे. यासाठी ते खरेदी करताना लेबल आवश्य वाचा.

5. चांगली झोप घ्या –
झोप व्यवस्थित पूर्ण न झाल्यास हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, डायबिटीज, हार्ट फेलियर आणि स्लीप डिसऑर्डरचा धोका वाढतो. यासाठी पूर्ण झोप घ्या.

6. मर्यादित प्रमाणात रेड वाईन घ्या –
काही मात्रेत रेड वाईन हृदयासाठी आरोग्यदायी मानली जाते. मात्र, याचे पुरावे नाहीत. जर तुम्ही अल्कोहल पित नसाल तर याची सुरूवात अजिबात करू नका. उलट एक्सरसाइज आणि हेल्दी डाएट घ्या.

7. तणाव कमी करण्यासाठी पद्धत शोधा –
तणाव आरोग्यासाठी धोकादायक आहे. तो ब्लड प्रेशरसह ओव्हरइटिंग आणि स्मोकिंगची सवय वाढवतो.
स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल बनवतात जे कोलेस्ट्रोल, ट्रायग्लिसराईड्स, ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर वाढवते.
यासाठी, हेल्दी लाईफस्टाईलसाठी तणाव कमी करा.

8. स्मोकिंग बंद करा –
हृदयासाठी सर्वात धोकादायक स्मोकिंग करणे आहे. हे धमण्यांना योग्य ठेवणार्‍या पेशींचे नुकसान करते.
आणि ब्लड क्लॉटिंग वाढवते. या कारणामुळे हार्टरेट आणि ब्लड प्रेशर वाढते.
सिगरेट तुमच्यासह तुमच्या आजूबाजूच्या लोकांचेही नुकसान करते.
जर तुम्हाला सिगारेट सोडण्यात अडचण येत असेल तर एक्सपर्टची मदत घ्या.

Web Titel :- Heart Disease | heart disease ways to prevent risk factors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | ’मी वेळ देत नाही, पण आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल’ – नारायण राणे

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेत 1.20 कोटी रूपये किंमतीचे 3 किलो सोन्याचे दागिने भरदिवसा लांबविले, लहान मुलासह 2 महिलांचा प्रताप, जाणून घ्या प्रकरण

BSP MP Satish Chandra Mishra | सतीश चंद्र मिश्रा यांचा दावा – यूपीत प्रत्येक 10 पैकी 8 एन्काऊंटर ब्राह्मणांचे होत आहेत