Heart Disease | आक्रोड खाल्ल्याने कमी होतो हृदय रोगांचा धोका, 8.5% पर्यंत कोलेस्ट्रॉलचा स्तर करते कमी – रिसर्चमध्ये दावा

नवी दिल्ली : Heart Disease | रोज अर्धा कप आक्रोड (Walnut) खाल्ल्यास हृदय रोगांचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) 8.5 टक्केपर्यंत कमी होतात. हा दावा हॉस्पिटल क्लिनिक डे बार्सिलोनाच्या संशोधकांनी आपल्या रिसर्चमध्ये केला आहे. संशोधक आणि बार्सिलोनाचे आहार तज्ज्ञ एमिलियो रोस यांनी म्हटले आहे की, यापूर्वीच्या अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, आक्रोड हृदय रोग आणि स्ट्रोकचा (Heart Disease) धोका कमी करते.

रोस यांनी म्हटले की, आम्ही आमच्या नवीन रिसर्चमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, याची हृदय रोगांमध्ये कोणती भूमिका आहे आणि कसा परिणाम करते. बॅड कोलेस्ट्रॉल कसे नुकसान करते, संशोधन कसे झाले, आक्रोड कशाप्रकारे हृदय रोगापासून बचाव करते आणि याचे फायदे कोणते आहेत.

संशोधकांनी आक्रोडचे फायदे जाणून घेण्यासाठी 628 लोकांवर दोन वर्षापर्यंत रिसर्च केला. त्यांचे वय 63 ते 79 वर्षाच्या दरम्यान होते. ते सर्व बार्सिलोना आणि कॅलिफोर्नियाचे राहणारे होते. त्यांना दोन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटाला रोज अर्धा कप आक्रोड खाऊ घालण्यात आले. दुसर्‍या गटाला दुसरे नट्स खाऊ घालण्यात आले.

दोन वर्षानंतर दोन्ही गटाच्या लोकांची तपासणी करण्यात आले आणि तपासणी रिपोर्टची तुलना झाली.
रिपोर्टमध्ये समोर आले की, रिसर्चमध्ये सहभागी ज्या लोकांनी आक्रोड खाल्ले त्यांच्या बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये
सरासरी 4.3 mg/dL पर्यंत घट झाली. यामध्ये एकुण कोलेस्ट्रॉल 8.5 mg/dL पर्यंत कमी झाले. बॅड कोलेस्ट्रॉलला लो-डेन्सिटी सिटी लायपोप्रोटीन म्हणतात.

हे देखील वाचा

PMPML | खुशखबर ! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लाखो प्रवाशांना ‘पीएमपी’ने दिली ‘ही’ विशेष सवलत, जाणून घ्या

Maharashtra Police News | बदली करा नाहीतर आत्मदहन, इशारा देऊन कर्मचारी ‘गायब’, पोलीस दलात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Heart Disease | studies research claims eating walnuts reduces the risk of heart disease lowers cholesterol level

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update