×
Homeआरोग्यHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने,...

Heart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Heart Disease | हिरवे गवत असेल आणि त्यावर दवाचे थेंब असतील तर हृदय आणि मनाला शांती मिळते. हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला शांती तर मिळतेच शिवाय हृदय निरोगी राहते. सकाळी हिरव्या गवतावर चालल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, त्यामुळे मनातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते. सकाळी हिरव्या गवतावर चालल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. (Heart Disease)

 

गवतावर चालल्याने जमीनीचे इलेक्ट्रॉन्स थेट मेंदूपर्यंत पोहोचतात, त्यामुळे मेंदूची क्रिया वाढते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गवतावर अनवाणी चालणे रक्तवाहिन्यांच्या हालचालींना गती देते. म्हणजेच रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह वाढतो. हिरव्या गवतावर चालण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

 

1. हृदय निरोगी राहते :
गवतावर चालल्याने पायांवर पडणार्‍या दाबाचा थेट परिणाम मेंदूवर होतो. यामुळे हार्मोन्सची क्रिया वाढते. त्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. हिरव्या गवतावर चालताना हृदयाचे ठोके आणि रक्तदाब संतुलित राहतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो. (Heart Disease)

2. इम्फ्लामेशन आणि वेदना दूर होतात :
हिरव्या गवतावर चालण्याने हिलिंग क्षमता वाढते. त्यामुळे संसर्ग किंवा दुखापत झाल्यानंतर सूज येणे किंवा जळजळ ही समस्या लवकर दूर होते. वेदनांमध्ये आराम मिळतो.

 

3. मानसिक आरोग्य राहते चांगले :
हिरव्या गवतावर चालण्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. मनावर सकारात्मक परिणाम होतो,
त्यामुळे जर तुम्हाला मन शांत ठेवायचे असेल तर सकाळी लवकर हिरव्या गवतावर अनवाणी चालावे.

 

4. झोपेच्या पॅटर्नमध्ये होते सुधारणा :
जर तुम्ही गवतावर अनवाणी चाललात तर रात्री शांत झोप लागते. हिरव्या गवतावर चालण्याने झोपेचा पूर्ण पॅटर्न सुधारेल.
गवतावर चालणे एकप्रकारे झोपेच्या गोळ्यांसारखे काम करेल.

 

5. दृष्टी सुधारते :
हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने दृष्टी सुधारते. एका संशोधनानुसार, गवतावर अनवाणी चालल्याने पायांच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या घोट्यावर सर्वाधिक दबाव पडतो.
या घोट्यांचा थेट संबंध डोळ्यांशी जोडलेला असतो, त्यामुळे अनवाणी चालणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Disease | walking barefoot on green grass reduced the risk of heart disease know 4 benefits of it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chickenpox in Children | जाणून घ्या मुलांना चिकनपॉक्स झाल्यास काय करावे आणि काय करू नये?

Brain Stroke | डोकेदुखी किंवा चक्कर येणे, ‘या’ अतिशय सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; ब्रेन स्ट्रोकचा वाढू शकतो धोका!

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News