Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   हृदय हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जन्माशी हृदयाचा थेट संबंध आहे, जर हृदयाने कार्य करणे थांबवले तर आपला श्वास थांबतो, धाप लागल्यामुळे जीवनाची गती थांबते.

ठळक मुद्दे

आरोग्यदायी अन्न हृदयरोग दूर ठेवण्यास मदत करते.

हृदय निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन समृध्द अन्न खावे.

डाळिंब केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर हृदयासाठीदेखील खूप फायदेशीर मानले जाते.

एखाद्या व्यक्तीने स्वस्थ रहाण्यासाठी त्याचे हृदयाचे आरोग्य निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. आज लोक हृदयाशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. ह्रदयविकार, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्यूअर हे सर्व हृदय संबंधित आजार आहेत. आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहाराकडे लक्ष देणे.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आरोग्यदायी अन्न हृदयरोग दूर ठेवण्यास मदत करते. पौष्टिक आहार केवळ हृदयाच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही तर पौष्टिक आहार जीवनासाठी देखील आवश्यक आहे. तर, आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

डाळिंब

डाळिंब केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर हृदयासाठीदेखील खूप फायदेशीर मानले जाते. डाळिंबामुळे रक्तातील नायट्रिक ऑक्साईड वाढते. ज्यामुळे धमन्यांचे संकुचन आणि रक्तदाब दूर केला जाऊ शकतो.

जवस

जवस बियाणे अनेक रोगांपासून आराम मिळवण्यासाठी वापरतात. त्यामध्ये फायबर आणि अल्कोलिक अ‍ॅसिड असते जे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइड नियंत्रित करू शकते.

टोमॅटो

टोमॅटो ही एक भाजी आहे जी आम्ही दररोज कोशिंबिरी आणि भाजी म्हणून वापरतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तवाहिन्यांची काळजी घेऊ शकते.

लसूण

लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. लसूण हृदयासाठी सर्वोत्तम आहे. हे संसर्ग आणि कर्करोगाच्या जोखमीपासून देखील संरक्षण करू शकते. त्यामध्ये असलेला एलिसिन घटक रक्ताच्या गुठळ्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यापासून रोखण्यात मदत करतात.

सफरचंद

सफरचंद हे असे फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंदांमध्ये पेक्टिन असते. ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या उघडण्यास उपयुक्त ठरू शकते. सफरचंद हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करू शकते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. त्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट्स, फायबर, फोलेट आणि पोटॅशियम रक्तातील कोलेस्टेरॉल आणि अमीनो ऍसिडची पातळी कमी करण्यास मदत करतात.

सुकामेवा

कोरड्या फळातील अक्रोड, काजू-बदाम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, तांबे आणि फायटोकेमिकल्स हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.