सुनील गावसकर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच ‘हार्ट टू हार्ट’ कनेक्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यांमध्ये सध्या पहिला कसोटी सामना सुरु आहे. गावसकर तिथे समालोचन करताना दिसतात. मधील सुट्यांमध्ये गावसकर हे शहरातही फिरायला जातात. याच विश्रांतीच्या वेळामध्ये सुनील गावसकर यांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण बऱ्याच जणांना माहीत नसेल. ही भेट क्रिकेटच्या कामासाठी नसून एका वेगळ्याच कामासाठी होती.

‘हार्ट टू हार्ट फाउंडेशन’ ही संस्था नवी मुंबई येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलशी संलग्न आहे. या संस्थेमध्ये नवजात बालकांना हृदय विकार झाला असले तर त्याच्यावर मोफत शस्त्रक्रीया केली जाते. गावसकर हे न्यूयॉर्क आणि अटलांटा येथे या संस्थेसाठी देणगी जमा करण्यासाठी गेले होते. यावेळी गावसकर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या कार्याबद्दल माहिती दिली.

गावसकर यांनी न्यूयॉर्क आणि अटलांटा येथे जाऊन 230 शस्त्रक्रीया होऊ शकतील, एवढी देणगी जमा केली आहे. कसोटी मालिकेनंतरही गावसकर काही कार्यक्रमांच्या माध्यमातून देणगी जमा करणार आहेत.

गावसकर ‘कॉमेंट्री’ करतानाच भडकले विराट कोहलीवर –

क्रिकेट सामन्यादरम्यान गावसकर कॉमेंट्री करत असतानाच विराट कोहलीवर भडकल्याचे पहायला मिळाले वेस्टइंडीज विरुद्ध आर अश्विनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे मात्र त्याला संघात स्थान न दिल्यामुळे गावसकर यांनी विराटवर तोफ डागल्याचे पहायला मिळाले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like