HeartBurn | छातीत जळजळीच्या 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचे असू शकतात संकेत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – HeartBurn | हार्टबर्न (heartburn) या समस्येने अनेक लोक त्रस्त असतात. हार्टबर्नमध्ये मनुष्याला छातीच्या अगदी मध्यभागी खुप जळजळ जाणवते. ही समस्या काही मिनिटांपासून अनेक तासापर्यंत असे शकते. हे अनेकदा प्रेग्नंसी, गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GERD) किंवा अँटी-इनफ्लेमेटरी ड्रग्ज (anti-inflammatory drugs) घेतल्याने होऊ शकते. परंतु छातीत होणारी ही जळजळ काही बाबतीत गंभीर आजाराचा संकेतसुद्धा असू शकते.

अलिकडे झालेल्या एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, हार्टबर्नची समस्या कॅन्सर आणि हार्ट अटॅक (cancer and heart attack) ची जोखीम वाढण्यासंबंधी असू शकते. यासाठी शरीरात हे संकेत दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा…

1. अनेक तास सतत छातीत जळजळ (HeartBurn) होणे

2. छातीत जळजळीचे लक्षण गंभीर होणे किंवा सतत होणे

3. गिळण्यास त्रास किंवा वेदना होणे

4. छातीत जळजळीमुळे उलटी होणे

5. शरीराचे वजन अचानक कमी होणे

6. दोन आठवड्यापर्यंत हार्टबर्न किंवा इनडायजेशनचे औषध घेणे आणि नंतर लक्षण जाणवणे

7. गंभीर प्रकारे घसा बसणे

8. जीव घाबरणे

 

* कॅन्सर –

हार्टबर्नसंबंधी समस्या अनेकदा घसा (व्हॉईस बॉक्स) किंवा पोटाच्या आतड्यांमधील (जीआय ट्रॅक्ट) कॅन्सरचे कारण असू शकते.

* हायटस हर्निया –
जेव्हा पोटाचा भाग डायफ्राममध्ये कमजोरीमुळे छातीच्या खालील भागाला वरच्या बाजूला ढकलतो तेव्हा त्यास हायटस हर्निया म्हणतात. छातीत वेदना किंवा जळजळ हे या समस्येचे लक्षण आहे.

* पेप्टिक अल्सर डिसीज –
पेप्टिक अल्सर डिसीजला तोंड देणारे लोक नेहमी छातीत जळजळ समजून दुर्लक्ष करतात. हार्टबर्न आणि पेप्टिक अल्सर डिसीजची लक्षणे बिलकुल एकसारखी असतात.

* हार्ट अटॅक –
हार्ट अटॅकच्या बाबतीत सुद्धा अनेकदा लोक यास हार्टबर्न समजून दुर्लक्ष करतात. यातील फरक समजण्यासाठी काही लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. छातीत जास्त वेदना, जास्त हार्टबीट, ओलसर त्वचा, इनडायजेशन आणि मळमळणे ही लक्षणे हार्ट अटॅकची वॉर्निंग साइन असू शकतात. छातीत जळजळीसह वेदना, तोंड कडू होणे, झोपल्यानंतर वेदना वाढणे, चटपटीत खाल्ल्यानंतर घशापर्यंत जळजळ वाढणे हार्टबर्नची प्रमुख लक्षणे आहेत.

Web Title :- Heartburn | 8 warning signs of heartburn could be serious illness like cancer or heart attack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

Sapna Choudhary | सपना चौधरीने केली आपल्या मुलाच्या नावाची घोषणा, तैमूरपासून सिंकदरपर्यंतचा केला VIDEO मध्ये उल्लेख

Pune Corporation | लोहगाव येथील पठारे वस्तीतील 2 अनधिकृत इमारती पालिकेने केल्या जमीनदोस्त