Heat Wave During Summer | ‘महाराष्ट्र, ओडिशासह तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटांची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी’ – हवामान विभागाचे महासंचालक डॉ. महापात्रा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Heat Wave During Summer | एल निनोची तीव्रता आता कमी होऊ लागली असली, तरी त्याचा परिणाम तापमान वाढीवर होणार आहे. त्यामुळे मार्च ते मे या काळात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. यंदा उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा सरासरीपेक्षा जास्त येऊ शकतात. महाराष्ट्र, ओडिशासह दक्षिणेतील तेलंगणासारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. महापात्रा (Mrutyunjay Mohapatra) यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीतील हवामानाच्या अंदाजाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.(Heat Wave During Summer)

ते म्हणाले, पॅसिफिक महासागरात एल निनो स्थिती सक्रिय होण्यास गेल्या वर्षी सुरुवात झाली होती. ही स्थिती मेपर्यंत कायम राहण्याचा अंदाज जागतिक प्रारूपांकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार आता एल निनोची तीव्रता कमी होत आहे. एल निनो मोसमी पावसाच्या सुरुवातीला संपुष्टात येईल. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल हा वातावरणीय घटक मार्च ते मे या काळात तटस्थ होईल.

डॉ. महापात्रा म्हणाले, देशभरात मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. सन १९७१ ते २०२० या कालावधीत देशभरातील मार्चमधील पावसाची सरासरी २९.९ मिलीमीटर आहे. त्यामुळे यंदा मार्चमध्ये सरासरीच्या ११७ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | पुणे : सासरी येण्यास नकार दिल्याने पत्नीवर वार, पतीला अटक

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे

Pune Cheating Fraud Case | बनावट सह्यांच्या आधारे भागीदाराकडून सव्वापाच कोटींची फसवणूक ! न्यायालयाने जामीन फेटाळूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा पीडित माणिक बिर्ला यांचा पत्रकार परिषदेत आरोप