Heat wave in monsoon | पावसाळ्यात सुरू आहे उष्णतेची लाट, बचावासाठी अवलंबा ‘या’ 7 टिप्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पावसाळा सुरू होताच उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळतो, परंतु यावेळी जुलै महिना सुरू होऊनही दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या अनेक भागात प्रचंड उष्णता जाणवत आहे. उन्ह आणि गरम हवा आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह नॉर्थ इंडियातील अनेक राज्यात विक्रमी उष्णता आहे. अशा वातावरणात लोकांनी काळजी घेतली नाही तर धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात… Heat wave in monsoon monsoon tips to avoid risk of loo in heat stroke summer

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

1 रिकाम्यापोटी बाहेर पडू नका –
अशा स्थितीत घरातून रिकाम्यापोटी बाहेर पडू नका. चक्कर, डोकेदुखी इत्यादी समस्या होऊ शकते. बाहेर पडताना पाणी किंवा सरबत प्या. ताक, दह्याचे सेवन करा.

2 मीठ-साखर-पाण्याचे मिश्रण –
सतत घाम येत असल्याने मीठ-साखर-पाण्याचे मिश्रण किंवा ओआरएसचे मिश्रण प्या. पाणी पित रहा. लिंबू पाणी पिऊ शकता.

3 बाहेर उन्हापासून बचाव करा –
उन्हात एकतर बाहेर पडू नका, जर गेलात तर छत्रीचा वापर करा, डोके झाकून घ्या. कॉटनचे कपडे घाला.

4 ही फळे खा –
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करा. कलिंगड, स्ट्रॉबेरीज, टरबूज, संत्रे आणि काकडी सेवन करा. सरबत प्या.

5 उन्हाळा लागल्यास डॉक्टरांकडे जा –
उष्णतेमुळे हीट स्ट्रोकचा धोका असतो.
यात डोकेदुखी, थकवा, सुस्ती, उलटी, पोटात दुखणे, अतिसार आणि चक्करची समस्या होऊ शकते.
उष्णतेने पीडित व्यक्तीने थंड पाण्याने आंघोळ करावी.
थंड पाण्यात कपडा भिजवून अंगाला लपेटल्यास आराम मिळतो.
ओआरएस मिश्रण घ्या. जास्त त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जा.

6 हे टाळा –
दारू, चहा, कॉफीचे सेवन टाळा. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते.
शरीराचे मेटाबॉलिज्म कमी होते.
तेलकट, मसालेदार भोजन टाळा.
हलके जेवण करा. दुधी भोपळा, टिंडा, भोपळा, तोंडली आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा.

7 बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा
उन्हाळा लागल्यास बेलाचा सरबत, लिंबू पाणी, आंब्याचे पन्हे किंवा शिकंजी लाभदायक आहे. एक्सपर्टनुसार, उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी बाहेर पडताना पाण्याची बाटली घेऊन जा. पाण्यात ग्लुकोज किंवा लिंबू मिसळून पिऊ शकता.

Web Titel : Heat wave in monsoon monsoon tips to avoid risk of loo in heat stroke summer

Pimpri-Chinchwad Crime News | बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘या’ 10 ठेकेदारांवर FIR, 8 जण ब्लॅक लिस्टमध्ये

Anil Deshmukh | देशमुखांच्या सचिवांचे तपासादरम्यान सहकार्य नाही, सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगतात – ED

Pune Crime Branch Police | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीपाठोपाठ मुलाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई