Heat Weather Forecast | पुढील दोन दिवसांत राज्याचे तापमान आणखी वाढणार; पावसाची प्रतिक्षा राहणार कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Heat Weather Forecast | सध्या राज्याला मान्सूनचे वेध लागले आहे. मात्र पुढचे दोन दिवस राज्याचे तापमान वाढणार असून सर्वांना आणखी काही काळ उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. पुढील २ ते ३ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात उष्णता वाढण्याची (Heat Weather Forecast) शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने (Meteorological Department) आज (दि. ०२) दिली आहे. दरम्यान कोकण (Konkan) आणि गोवा (Goa) या किनारपट्टीवरील तापमान देखील काही प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे येथील हवामान उष्ण व दमट राहणार आहे. तसेच विदर्भात देखील पुढील काही दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/Indiametdept/status/1664552435745161216?s=20

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यात ६ जूनपर्यंत तुरळक पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये ४ जूनला विदर्भ (Vidarbha) वगळता संपूर्ण राज्यात तसेच ५ जूनला उत्तर कोकण वगळता राज्यात इतरत्र ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तर ६ जूनला दक्षिण कोकण किनारपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) आणि संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता (Weather Forecast) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Heat Weather Forecast)

सध्या राज्यभरातच नाही तर देशभरात मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
मान्सून (Monsoon) देखील केरळच्या किनारपट्टीकडे वाटचाल करत आहे.
दक्षिण अरबी समुद्र (South Arabian Sea), मालदीव (Maldives), लक्षद्वीपचा काही भाग,
संपूर्ण कमोरीन क्षेत्रात बंगालच्या उपसागराच्या (Bay Of Bengal) काही भागात नैऋत्य मान्सून वारे सक्रिय
झाले असून, ते पुढे सरकत आहे. या भागात मान्सून सक्रियसदृष्य स्थिती निर्माण झाली असून पाऊस लवकरच अरबी समुद्रात दाखल होणार आहे. तसेच पुढील काही दिवसांत म्हणजे ८ जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. पण त्यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी उष्णता वाढणार (Mansoon Update) असल्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवली आहे.

Advt.

Web Title : Heat Weather Forecast | The temperature of the state will increase further in the next two days; Waiting for rain forever

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा