Heatstroke in Maharashtra | राज्यात पारा चढता; उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Heatstroke in Maharashtra | राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. अनेक शहरांमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे (Heatstroke in Maharashtra) तीन जणांचा मृत्यू (Died) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावमध्ये (Jalgaon) एक तर नागपूरमध्ये (Nagpur) दोघांचा मृत्यू झाला आहे. (The heat wave is intensifying in the Maharashtra)

 

उष्णतेच्या पाऱ्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जगातील उष्ण शहरांच्या यादीत राज्यातील पाच शहरांचा समावेश झाला आहे. पारा वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत असून नागरिक घराबाहेर न पडणेच पसंत करत आहे. जसा पारा वाढू लागला आहे तसा लोकांचा कल थंड पेय पिण्याकडे वाढला आहे. विदर्भ आणि जळगावमध्ये उन्हाने कहर केला आहे. नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या (Sitabuldi Police Station) हद्दीत रिजर्व बँक चौकात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Heatstroke in Maharashtra)

 

तर दुसरी घटना कॉटन मार्केट परिसरात घडली आहे. दोन्ही व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर पडले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. प्राथमिक अहवालात दोघांचा उष्माघाताने (Heatstroke) मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

घरी आल्यावर शेतमजुराचा मृत्यू –
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील 48 वर्षीय शेतमजुराचा घरी आल्यानंतर उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील हा दुसरा बळी आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी (Sunderlal Sukdev Gadhari) अस या शेतमजुराचे नाव आहे. गढरी हे बकऱ्या चारण्यासाठी मेहुनबारे परिसरात गेले होते. दुपारी त्यांना चक्कर येऊ लागल्याने ते घरी परत आले. त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. खासगी डॉक्टराने त्यांना तपासले असता उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
उष्माघातामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे मत शेतमजूर सुंदरलाल गढरी यांच्या मुलाने सांगितले.
गढरी यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.
घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मोलमजुरी आणि बकऱ्या चारून कुटुंबाचा चरितार्थ चालत होता.
गढरी यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Web Title :- Heatstroke in Maharashtra | 3 people died due to heatstroke in the maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा