Heatwave in India | देशात 2 दिवस उष्णतेची लाट; जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती काय?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Heatwave in India | एप्रिल महिन्यापासून राज्यासह देशात उन्हाचा चटका लागला आहे. सध्याही अनेक राज्यात तापमानाचे प्रमाण उच्च आहे. वाढत्या तापमानामुळे गरमीचे प्रमाण वाढलं आहे. अशातच आता भारतात दोन दिवस उष्णतेची लाट (Heatwave in India) येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department (IMD) वर्तवण्यात आला आहे. 14 आणि 15 मे रोजी भारतात उष्णतेची लाट असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

पुढील काही दिवसांमध्ये देशाच्या वायव्य आणि मध्य भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम (North-West India) आणि मध्य भारतात (Central India) आगमी 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहील आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे. आयएमडीने आपल्या हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, आगमी 3 दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल. असं हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) सांगितलं आहे. (Heatwave in India)

 

 

आगामी दोन दिवसांत भारताच्या पूर्व भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये शनिवारपासून तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होणार आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या पश्चिम भागात 14 मे रोजी म्हणजे आज उष्णतेची तीव्र लाट असणार आहे. शिवाय 14 मे रोजी पूर्व राजस्थानमध्ये आणि 15 मे रोजी राजस्थानच्या इतर भागात उष्णतेची लाट असणार आहे. 14 मे रोजी उत्तर प्रदेशमधील पश्चिम भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट असेल. तर पंजाबमध्ये 15 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.

 

महाराष्ट्रातील स्थिती काय असणार…

14 आणि 15 मे रोजी राज्यातील विदर्भात (Vidarbha) उष्णतेची लाट असेल.
अमरावतीमध्ये (Amravati) आगामी 2 दिवस तीव्र उष्णतेची लाट असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
अकोल्यामध्ये काल 44.7 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.
आगामी 2 दिवस हेच तापमान कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

Web Title :- Heatwave in India | heatwave in india continue today tomorrow Indian Meteorological Department imd weather update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा