home page top 1

उस्मानाबाद जिल्ह्यात वीज-वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – आज कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून आथर्डी येथील युवकाचा मृत्यू झाला. शुभम महादेव चौधरी (वय – 22) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

शुभम चौधरी हा शेतातील सोयाबीन काढत होता. त्यावेळी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे तो शेतातील बांधावर असलेल्या झाडाखाली आडोशाला उभा राहीला. त्याच वेळी झाडावर वीज कोसळल्याने त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उच्च शिक्षीत असलेल्या शुभमच्या मृत्यूमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.

शुभम चौधरी हा हुमनाबाद येथील कॉलेजमध्ये बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. दसरा सणासाठी तो गावी आला होता. आज तो शेतातील सोयाबीन पिक काढण्यासाठी गेला होता. त्याच्या पश्चात एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

visit : policenama.com 

Loading...
You might also like