Gold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय म्हणत आहेत एक्सपर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत Gold And Silver Price मोठी घसरण दिसून आली आहे. तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये International Market सोने 10 दिवसांच्या खालच्या स्तरावर गेले आहे. जाणकारांनुसार, येत्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण पहायला मिळू शकते. याचे कारण आहे फेड रिझर्व्हची मीटिंग. ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत दबाव दिसू शकतो. तर सध्या डॉलर इंडेक्समध्ये तेजी आहे. ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. अखेर परदेशी आणि स्थानिक बाजारात सोने आणि चांदीचे Gold And Silver Price काय भाव आहेत ते जाणून घेवूयात…

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

डॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50 लाखांची खंडणी

न्यूयॉर्कच्या कॉमेक्स बाजारात Comex Market सोने 20.50 डॉलर प्रति औंसच्या घसरणीसह 1859.10 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
तर गोल्ड स्पॉट 17.88 डॉलर प्रति औंसच्या घसरणीसह 1859.65 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. जो 4 जूनचा खालचा स्तर आहे.
चांदी 1 टक्केपक्षा जास्त घसरणीसह 27.84 डॉलरसोबत व्यवहार करत आहे.
तर सिल्व्हर स्पॉटचे दर 0.54 टक्केच्या घसरणीसह 27.77 डॉलरवर व्यवहार करत आहे.

स्थानिक बाजारात सोन्याचा दर :
मल्टी कमोडिटी इंडेक्समध्ये Multi Commodity Index सोने 400 रुपयांच्या घसरणीसह 48502 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
तर आज व्यवहारी सत्राच्या दरम्यान सोने 48377 रुपये प्रति दहा ग्रॅमसह दिवसाच्या खालच्या स्तरावर पोहचले होते. तर आज सोन्याची सुरूवात 48750 रुपये प्रति दहा ग्रॅमसह झाली होती.
तर मागील आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोने 48,903 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले होते.
मागील आठवड्यात सोने 0.16 टक्के स्वस्त झाले होते.

चांदीच्या किंमतीत मोठी घसरण :
चांदीच्या किंमतीत सुद्धा मोठी घसरण पहायला मिळाली.
दुपारी 3 वाजता चांदी वायदा बाजारात 500 रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त घसरणीसह 71713 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत होती.
आज चांदी 71464 रुपये प्रति किलोग्रॅमसह दिवसाच्या खालच्या स्तरावर होती.
तर आज चांदीची सुरूवात 72000 रुपये प्रति किलोग्रॅमसह झाली होती.
मागील आठवड्यात चांदी 0.96 टक्के स्वस्त झाली होती.

Royal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा आहे हा प्लॅन

काय सांगतात एक्सपर्ट :
केडिया अ‍ॅडव्हायजरीचे डायरेक्टर अजय केडिया यांच्यानुसार, येत्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसू शकते. 15 आणि 16 जूनला फेड रिझर्व्हची बैठक आहे. ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत दबाव दिसू शकतो. तर आयआयएफलचे IIFL व्हाईस प्रेसीडेंट (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गप्ता यांच्यानुसार डॉलर इंडेक्समध्ये तेजीच्या कारणामुळे सोने आणि चांदीत घसरण आहे. सध्याचा काळ सोने आणि चांदीच्या गुंतवणुकदारांसाठी खुप चांगला आहे. किंमत कमी होत आहे. कमी किंमतीत खरेदी करून गुंतवणुकदार Investor येत्या काळात चांगला रिटर्न मिळवू शकतात.

Web Title : heavy fall in gold and silver price know what experts say about investment

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव ! कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा संसार उध्वस्त

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक