नेरुळच्या ‘बीम बीच’वरील इमारतीला भीषण आग, 3 जवान जखमी

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सी वूडस -नेरुळ परिसरातील पामबीचला लागून असलेल्या सीहोम्स या इमारतीच्या २१ व २२ व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे.

पाम बीचला लागून असलेल्या सीवूडस सेक्टर ४१ अ येथील सीहोम्स या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यांवर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून इमारतीतील रहिवाशांना इमारतीतून खाली आणण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व ५० ते ६० जवान आग विझविण्याचे काम करीत आहे. आग विझविण्यासाठी सर्वात मोठी शिडी असलेली गाडी आणण्यात आली असून तिच्यावरुन पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, 3 जवान जखमी झाले आहेत.