राज्यात येत्या २४ तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

येत्या 24 तासात राज्यभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. दोन दिवस झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे राज्यभर हजेरी लावली आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील 24 तासात रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. ३ जून ते ५ जून पर्यंत हा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन विभागाकडून आले आहे.