अहमदनगर : शहरात जोरदार पाऊस, अनेकांच्या घरात पाणी घुसले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावल्याने अनेक घरात पाणी शिरले. या पावसात महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था कोलमडली. अनेक घरांमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. अनेक दुकानांतही पाणी गेले आहे.

गेल्या अनेक दिवसानंतर नगर शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी दीड तास झालेल्या पावसाने नगरमध्ये हाहाकार उडवला आहे. नगर शहरातील गुलमोहर रोड भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. दुकानेही पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले चित्र पाहायला मिळाले. या परिस्थितीत महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था नेमकी कुठे गेली, हे समजायला तयार नाही.

मनपा आपत्ती व्यवस्थापनमधील एकही कर्मचारी या नागरिकांकडे फिरकला नाही. त्यामुळे नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. महानगरपालिकेकडून पाणी उपसणे बाबत कोणतीच मदत न भेटल्याने नागरिक हतबल झालेले दिसत होते. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like