लोणावळा,मावळ परिसरात जोरदार पाऊस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.तूच बरोबर पुण्याच्या मावळ आणि लोणावळा परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावल असून सद्य स्थितीला संततधार सुरू आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस जास्त कोसळला असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.तर पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धारण क्षेत्रात गेल्या २४ तासात ६४ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.लोणावळा हे पर्यटन स्थळ असून वर्षाविहारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात.भुशी डॅम देखील ओसंडून वाहात आहे.

राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.याचा फायदा शेतकऱ्यांसह शहरवासीयांना झाला.लोणावळ्यात गेल्या २४ तासात ९६ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली असून ४२४८ चालू वर्षाचा ऐकून पाऊस झाला आहे.तर गेल्या वर्षी ४१३२ मिलिमीटर एवढ्या पाऊसाची नोंद झाली होती.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.

तर पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात ६४ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.आत्तापर्यंत ऐकून २७७४ मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून गेल्या वर्षी २५८२ मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाला आहे.पवना धरणातून ४७८५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पवना नदी काठी राहात असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.