राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचं ‘थैमान’, कोरोनाची भीती वाढली

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – आज सर्वत्र जगभर कोरोना व्हायरस अत्यंत वेगाने पसरत आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असताना, महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे. राज्यात पुढील काही दिवस औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे आणि मध्य प्रदेश मधील भोपाळ, बैतूल, होशंगाबाद आणि देवास यासारख्या काही प्रमुख ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आहे वाईट बातमी
अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे कोरोना चा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, पुणे, मालेगाव, कोल्हापूर हे जिल्हे वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तापमनात ६ अंशांनी घाट होणार आहे. सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकला, दमा इत्यादी रोगांचा उपद्रव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महाराष्ट्रातील या शहरांत अवकाळी पावसासह गारपीट
हिंगोली जिल्ह्यांत गारपीट झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून,अनेक पोपट पक्षी सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत. हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी ,वसमत, सेनगाव तालुक्यात गारपीटसह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे काढणीला आलेल्या गहू व हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर मध्ये देखील जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे त्यासोबतच उस्मानाबाद, नांदेड मधील काही गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे बीड मध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलेला आहे. परभणी जिल्ह्यांत सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, हवेत गारवा निर्माण झाला असल्याने कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.