मान्सूनपूर्व पावसाची दुसऱ्या दिवशी दमदार हजेरी

पुणे : मान्सून पूर्व पावसाने सलग दुसऱ्या दिवशी दमदारर हजेरी लावली. आज (मंगळवार, दि. 2 जून) सायंकाळी साडेसात ते साडेआठपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. रविवारी रात्रीपासून सोमवारी भल्या पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अचानक आकाशामध्ये काळेकुट्ट ढग जमा झाले आणि पाऊस कोसळू लागला. त्यामुळे चाकरमान्यांसह भाजीपाला विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले.

हडपसर आणि परिसरामध्ये दमदार पाऊस सुरू होता. मात्र, वादळी वारे नसल्याने पडझड झाली नाही. सखल भागात पाणी साचले होते, तर रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्रेत्यांनाही आजच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, सोलापूर रस्त्यावर भाजीपाला खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोचालकांना ग्राहक मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनीही पावसात थांबणे पसंत केले होते.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या तारखेपासून पाऊस सुरू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. तर रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे दुचाकीचालकांना कसरत करावी लागली. कोरोना विषाणूचे रुग्ण आणि बाधित वाढत आहेत. त्यातच कालपासून वातावरणात एकदम बदल झाल्याने आता कोरोनाचा विषाणू वाढणार की काय, अशी भीती नागरिकांना सतावू लागली आहे. कोरोनाविषाणूविषयी उपनगर आणि लगतच्या खेड्यात चांगलीच घबराटी पसरली आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक उद्योग-धंदे, कंपन्या आणि बहुतेक सर्वच दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे. शेतीची मशागत झाली असून, आता बि-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे.

शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने सोमवारपासून सलग दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. शिवाय सोमवार दिवसभर आणि मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू आहे. यामुळे शहर आणि जिल्हावासीयांना उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री अनेक जिल्ह्यातील तालुक्यात जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागच्या महिनाभरापासून जाणवणाऱ्या उकड्यापासून मात्र जिल्हावासीयांची मुक्तता झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like