Pune : रात्रीतुन पुण्यात धो-धो, शहरातील 40 सोसायट्यामध्ये पाणी शिरल्याचे अग्निशमन दलाकडे ‘कॉल’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुण्यात बुधवारी पावसाने कहर केला अन रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे पाहिला मिळाले. दुपारपासून सुरू असणाऱ्या पावसाने रात्री चांगलाच जोर धरला. तास दीड तास झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी आलेच पण दुकान सोसायट्या आणि घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. कात्रज तळे ओव्हर फ्लो झाले होते. तर ओढे भरून वाहत होते. यात रस्ते खचले असून, काही ठिकाणी रस्ते उखडले गेले आहेत.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचे सांगितले आहेत. जिल्ह्यात मुसळधार व अतिमूसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. पहिला दिवशी हा अंदाज पावसाने खरा ठरवला. बुधवारी दिवसभर ढग भरून आले होते. मात्र पाऊस नव्हता. परंतु, दुपारी पावसाला सुरुवात झाली. रात्री साडे नऊ ते आकरा वाजेपर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला. काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचू लागले. दुचाकी चालक आणि कार चालकांची यामुळे तारांबळ उडाली. काही वेळातच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. तर तळ मजले, सोसायट्या आणि रस्त्यालगत असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यात डांबरी रस्ते उखडून गेले आहेत. मोठं मोठे खड्डे पडले असून, त्यात मोठे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाकडे शहरात 40 ठिकाणी सोसायटीत व दुकानात पाणी शिरले असल्याचे कॉल प्राप्त झाले आहेत. येरवडा, शुक्रवारी पेठ मध्यवस्तीचा काही भाग तसेच सिंहगड रोड, दत्तवाडी, सहकारनगर आणि इतर भागात सर्वाधिक पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी मात्र अश्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर आले होते. आंबील ओढा फुटल्यानंतर अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले होते. गेल्या वर्षी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर शेकडो वाहनांचे नुकसान झाले होते. यंदा सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.