धुळे : शिरपूरात तुफान गारपिटीमुळे घर कोसळून एक ठार तर तीन जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील शिरपूर गावात मंगळवारी सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांचे छतावरील पत्रे उडाले. पेट्रोल पंपावर छताचे पत्रे उडाले आहेत. रस्त्यावरील झाडे, वीज खांब कोसळून मोठे नुकसान झाले आहे. शेतात पिकावर गारांचा मारा झाल्याने पिके वाकून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. तीन दिवस गावात विद्युत पुरवठा खंडित राहील असे वीज वितरण अभियंता यांनी सांगितले.
rain
या दरम्यान शिरपूर गावातील एक जुने घर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून राजेंद्र माळी यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारार्थ ग्रामिण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. शिरपूर पोलीस स्टेशन आवारात उभ्या असलेल्या पोलीसांच्या गाडीवर झाड उन्मळून पडले. गारपिटीत गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पाऊस थांबल्याने रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे, वीज खांब, तारा बाजूला करण्यासाठी जे.सी.बी.मशीन व नगरपालिका कर्मचारी मदत घेण्यात येत आहे. नागरिकही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. प्रशासनाच्या वतीने तातडीने मदतकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु अंधार असल्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like