Heavy Rain | कोयना, उरमोडी धरणातून नदीत पाणी सोडणार; कोयना धरणात गेल्या 12 तासात साडेसहा TMC पाणीसाठा वाढला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाबळेश्वर, नवजा परिसरात अतिवृष्टी (Heavy rain) झाल्याने कोयना धरणात एकाच दिवसात साडेसहा टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे़ धरणातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर गेला असून धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. उरमोडी आणि कण्हेर धरण (Urmodi and Kanher dams) परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस (Heavy Rain) झाला असून आज दुपारपासून धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

कोयना धरणावर (Koyana Dam) गेल्या २४ तासात ३४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर ४२४, नवजा ४२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मागील १२ तासात ६.४७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणाची पाणी पातळी ७ फुटाहून अधिक वाढली आहे. याचबरोबर येत्या काही दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केला आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

उरमोडी धरणात (Urmodi Dam) ६२ टक्के पाणीसाठा झाला असून गेल्या २४ तासात १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने आज दुपारनंतर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

कण्हेर धरत (Kanher dam) परिसरात ९२ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून ५ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येणार आहे.

कृष्णा खोर्‍यातील सर्व धरण परिसरात मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला आहे. धोम
बलकवडी ३१० मिमी, तुळशी २३४ मिमी, राधानगरी १९४, धोम १६८ मिमी, वारणावती १८५ मिमी,
दुधगंगा ११७ मिमी, कासारी २५६ मिमी, पाटगाव १८३, तारळी २३३ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

हे देखील वाचा

Suspension | ‘त्या’ चार वरिष्ठांवर कारवाई झाल्यानंतर ‘उत्पादन शुल्क’च्या 4 बड्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; आयुक्त कांतीलाल उमाप यांची कारवाई, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Heavy Rain | Koyna, Kanher, Urmodi dams will release water into the river

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update