मुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत Mumbai मान्सून Monsoon दाखल झाला असून बुधवारी (दि. 9) झालेल्या पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. शहर अन् उपनगरात अनेक भागांत पाणी Water साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी देखील मुंबई Mumbai आणि आसपासच्या भागांमध्ये पाऊस Rain होता. त्यामुळे वेग मंदावला आहे. दरम्यान पावसाळ्याच्या 4 महिन्यांत 18 दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने Meteorological Department दिला आहे. या 18 दिवसात अरबी समुद्राला भरती येणार असून 5 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. यात 6 दिवस जूनमधील आहेत. तर जुलैमधील 12 दिवस, ऑगस्टमध्ये 5 दिवस आणि सप्टेंबरमध्ये 2 दिवस समुद्राला भरती येईल. या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागेल, अशी सूचना दिली आहे.

Thane News | ठाणे पोलिसांची कारवाई ! शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच

मुंबईत Mumbai दरवर्षी साधारणपणे 10 जूनला पावसाचे आगमन होते. मात्र यंदा एक दिवस अगोदरच मान्सून दाखल झाला आहे. बुधवारी सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारीही पाऊस सुरुच होता. मुसळधार पाऊस अन् त्याचवेळी समुद्राला भरती आल्यास मुंबईकरांसमोर दुहेरी संकट निर्माण होते. त्यामुळेच हवामान विभागाने भरतीची माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोना Corona रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी अनेक जण बाहेर पडतात. अशावेळी भरती आल्यास दुर्घटनांचा धोका अधिक असतो. त्यामुळेच हवामान विभागाने भरतीची माहिती दिली आहे.

भरतीची तारीख – वेळ – लाटांची उंची (मीटरमध्ये)
जून
23 जून- 10.53 – 4.56
24 जून- 11.45 – 4.77
25 जून- 12.33 – 4.85
26 जून- 13.23 – 4.85
27 जून- 14.10 – 4.76
28 जून- 14.57 – 4.61

जुलै
23 जुलै – 11.37- 4.59
24 जुलै- 12.24 -4.71
25 जुलै- 13.07 4.73
26 जुलै- 13.48 – 4.68
27 जुलै- 14.27 – 4.55

ऑगस्ट
10 ऑगस्ट- 13.22 – 4.50
11 ऑगस्ट- 13.56 – 4.51
22 ऑगस्ट- 12.07- 4.57
23 ऑगस्ट- 12.43- 4.61
24 ऑगस्ट- 13.17 – 4.56

सप्टेंबर
8 सप्टेंबर- 12.48 – 4.56
9 सप्टेंबर- 13.21 – 4.54

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात