आगामी 24 तासात काही ठिकाणी ‘रिमझिम’ पाऊस, ‘या’ राज्यात थंडी वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मराठवाड्यासह देशात अरुणाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, सौराष्ट्र, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा, तमिळनाडू, किनारी आणि दक्षिण कर्नाटक आणि केरळच्या काही भागात तसेच कोकण, गोवा आणि रायलसीमेच्या काही भागात तापमान सामान्यापेक्षा जास्त राहिल.

आसाम, मेघालय, पश्चिम बंगालचे पर्वतीय भाग, सिक्किम, बिहार, पश्चिम उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, रायलसीमा, उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या काही भागात तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त असेल.

ओडिसा, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या काही भागात रात्री तापमान सामन्यापेक्षा कमी असेल आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात तापमान सामान्यापेक्षा खुपच कमी असेल.

पुढील 24 तासात दक्षिण तमिळनाडूच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. परतीचा मान्सून कर्नाटकच्या किनारी भागात कमजोर असेल. तमिळनाडू, पाँडेचेरी, काराईकल केरळ आणि माहे मध्ये विविध भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

पूर्व अरुणाचल प्रदेश, दक्षिण आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये विविध भागात दाट धुक्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरच्या काही भागात तसेच राजस्थान, तमिळनाडू, उत्तर आणि अंतर्गत कर्नाटक, केरळ, अंदमान निकोबार द्विप समूह, आसाम, मेघालय, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, रायलसीमा आणि कर्नाटकच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि लक्षद्विप मध्ये वातावरण कोरडे होते.

Visit : Policenama.com