आगामी 24 तासात महाराष्ट्रासह ‘या’ 17 राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – दक्षिण पश्चिम मान्सून तेलंगाणामध्ये अतिसक्रिय राहिला तर दक्षिण मध्य कर्नाटकमध्ये देखील मान्सूनचा जोर पाहायला मिळाला. आसाम, मेघालय, पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या किनारी भागात, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि विदर्भात मात्र पावसाचा जोर कमी राहिला. दक्षिण पश्चिम मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, झारखंड, बिहारच्या काही भागात तर समाप्त झाला.

पूर्व आणि मध्य भारतातील अधिकतर भागात, उत्तर पूर्व भारत आणि पश्चिम भारताच्या काही भागात उत्तर अरबी समुद्राच्या उरलेल्या भागात तसेच मध्य अरबी समुद्रात काही भागात 2 – 3 दिवसात मान्सून कमकुवत होण्याचा स्थिती आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेशच्या काही भागात परिस्थिती सामान्य असेल. बाडमेर (पश्चिम राजस्थान) मध्ये सर्वात आधिक तापमान 37.4 डिग्री सेल्सिअल होते.

पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश आणि सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात रात्रीचे तापमान सामान्य राहिले. सर्वात कमी तापमान सीकर (पश्चिम राजस्थान) मध्ये 15.5 डिग्री सेल्सियस राहिले. ओडिसा, किनारपट्टीय आंध्रप्रदेश, किनारपट्टीय कर्नाटक आणि केरळमध्ये विविध ठिकाणी काळ रात्री 20.30 वाजेपासून आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत वादळी वाऱ्यांचा प्रभाव राहिला.

पुढील 24 तासात किनारपट्टीय आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडू, पाँडेचेरी आणि काराईकल, दक्षिण मध्य कर्नाटक, केरळ आणि माहे मध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, ओडिसा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगढ, किनारपट्टीय आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडू, पाँडेचेरी, कराईकल कर्नाटक, केरल आणि माहे मध्ये विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मागील 24 तासात केरळमधील विविध भागात तसेच पश्चिम बंगालच्या पर्वतीय प्रदेशात, सिक्किम, तेलंगाणा, किनारपट्टीय कर्नाटक, दक्षिण कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये अनेक भागात पाऊस झाला. नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिसा, मराठवाडा आणि किनारपट्टीय आंध्र प्रदेशातील काही स्थानांबरोबरच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, रायलसीमा, तमिळनाडू आणि उत्तर कर्नाटकमध्ये विविध भागात पाऊस झाला. मुख्य स्वरुपात पश्चिम बंगाल मध्ये गंगेच्या मैदानी प्रदेशात, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, अंदमान निकोबार द्वीप समूहात मान्सूनची परिस्थिती राहिली.

Visit : Policenama.com